एक्स्प्लोर

Covid 19 Vaccine : भारतात अशी सुरुये कोरोना लसीच्या साठवणीची तयारी

मागील साधारण वर्षभरापासून जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसनं देशापुढं बरीच आव्हानं उभी केली. अखेर आता देशात कोरोना लसीसंदर्भातील काही सकारात्मक संकेत मिळाले असून, या लसीच्या साठवणीसाठीची तयारी सुरु करण्यात आली आहे. कशी सुरुये ही तयारी चला पाहूया....

नवी दिल्ली : देशाच्या आरोग्य मंत्रालयाकडून मंगळवारी अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यात आली. ज्याअंतर्गत मोठ्या स्तरावर कोरोना लसीकरणापूर्वी या लसीच्या साठवणीसाठी कशी तयारी करण्यात आली हे, याची माहिती देण्यात आली. केंद्रातील आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी यासंदर्भातील माहिती दिली. है तय्यार हम.... भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात सध्याच्या घडीला Coronavirus covid 19 वरील लसीच्या साठवणीसाठी 29,000 कोल्ड चेन पॉईंट्स, 240 वॉक इन कूलर, 70 वॉक इन फ्रिजर, 45,000 आईस लाईन रेफ्रिजरेटर, 41,000 डीप फ्रिजर आणि 300 सोलार रेफ्रिजरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना लसीच्या साठवणीसाठी वरीलपैकी बरीच सामग्री राज्यांना देण्यात आली आहे. तर, उर्वरित सामग्री देण्याचं काम सुरु असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. राज्यांना देण्यात आली मार्गदर्शक तत्व... केंद्राकडून कोरोना लसीसाठीच्या कोल्ड चेनसंदर्भातील सर्व मार्गदर्शक तत्वं केंद्राकडून आखून देण्यात आली आहेत. संबंधित राज्यांना यासाठीचं मार्गदर्शन करण्यात आलं आहे. शिवाय महत्त्वाच्या सामग्री आणि यंत्रांच्या वापरासंदर्भातही मार्गदर्शन करण्यात आलं असल्याची माहिती भूषण यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली. लसीकरणाच्या प्रक्रियेत असणार कोणाचा सहभाग? देशभरात होणाऱ्या कोरोना लसीकरणाच्या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या व्यक्ती आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबीरंही घेण्यात आली आहेत. मेडिकल ऑफिसर, वॅक्सिनेटर ऑफिसर, अल्टरनेटीव्ह ऑफिसर, कोल्ड चेन हॅन्डलर, सुपरवायझर, डेटा मॅनेजर, आशा सेविका यांना प्रत्यक्ष आणि डिजिटल स्वरुपातून यासंदर्भातील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. काही ठिकाणी ही सत्र अद्यापही सुरु आहेत. Vaccination लसीकरण प्रक्रियेदरम्यान उदभवणारी आव्हानाची परिस्थिती आणि त्यावर मात करण्य़ासाठीही केंद्राकडून पथकांची आखणी करण्यात आली आहे. देशातील कोरोना लसीकरणासाठी आता अवघे काही महिने शिल्लक असल्याची घोषणा केल्यानंतर काही दिवसांतच लसीच्या साठवणीसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यात आली. Covid-19 Vaccine Operational Guidelines नुसार, वॅक्सिन कॅरिअर, वॅक्सिन वेल्स, आईस पॅक हे थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवण्याचे निर्देश आहेत. याशिवाय लसीकरणाच्या सत्राच्या शेवटी आईस पॅक आणि न वापरलेल्या लसी वॅक्सिन कॅरिअरच्या माध्य़मातून पुन्हा कोल्ड चेन पॉइंटपाशी पाठवण्यात येणार आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
Mamata Banerjee: 'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
कापूस आयातीवरील सीमाशुल्क पूर्णपणे माफ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
कापूस आयातीवरील सीमाशुल्क पूर्णपणे माफ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Metro : ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
IPL 2026 Final Prediction : बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
Mamata Banerjee: 'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल
लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल
Vinesh Phogat: व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
Embed widget