एक्स्प्लोर
'नेताजींची संपत्ती पाकिस्तानला देण्यास नेहरु सरकार तयार होतं'
!['नेताजींची संपत्ती पाकिस्तानला देण्यास नेहरु सरकार तयार होतं' India Had Agreed To Share Funds Of Ina Iil With Pak In 1953 'नेताजींची संपत्ती पाकिस्तानला देण्यास नेहरु सरकार तयार होतं'](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/31090339/hqdefault-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली: 1953 साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या इंडियन नॅशनल आर्मी (INA) आणि इंडियन इंडिपेडन्स लीग (IIL) चा फंड पाकिस्तानसोबत वाटपास पंडीत जवाहरलाल नेहरु तयार होते. या संबंधातील कागदपत्रे मंगळवारी सार्वजनिक केल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नेताजींनी मागे ठेवलेल्या संपत्तीची चौकशी करावी, अशी विनंती पश्चिम बंगालच्या विधीमंडळाने 1953 साली केंद्र सरकारला केली होती. त्याला 18 ऑक्टोबर 1953साली तत्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी पत्राद्वारे उत्तर दिले होते.
या संबंधातील 1951 ते 2006 मधील परराष्ट्र खात्याच्या सातव्या बेंचच्या 25 फाईल मंगळवारी सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव एन.के सिन्हा यांनी ऑनलाईन सार्वजनिक केल्या आहेत. यापूर्वीही नेताजींसंदर्भातील 100 फाईल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत सुभाषचंद्र बोस यांच्या 119 व्या जयंतीला म्हणजेच 23 जानेवारी रोजी सार्वजानिक केल्या. तर दुसऱ्या टप्प्यातील 50 फाईलपैकी 25 फाईल मार्चमध्ये सार्वजानिक करण्यात आल्या होत्या.
या पत्रामध्ये, पूर्वेकडील युद्धसमाप्तीच्या दरम्यान INAआणि IILने अशिया खंडातील देशातून सोने आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त केल्या होत्या. ही सर्व संपत्ती सध्या सिंगापूरच्या ताब्यात आहे. यासंबंधीची माहिती1950 साली सिंगापूर सरकारने दिली होती. या सर्व संपत्तीचं ब्रिटीश चलनानुसार अंदाजे मूल्य 1 कोटी 47लाख 163 स्ट्रेटस डॉलर होते. पण याचे पुनर्मूल्यांकन शक्य नसल्याने त्याची योग्य मूल्य सांगणे अशक्य आहे.
या संपत्तीवर पाकिस्ताननेही आपला अधिकार सांगितल्याने त्यांच्याशी या संबंधात वाटाघाटी सुरु आहेत. या वाटाघाटीत भारत आणि पाकिस्तान 2:1प्रमाणात वाटण्याचा तोडगा निघाल्याचे या पत्राद्वारे नेहरुंनी सांगितले होते.
याशिवाय हा फंड रिलीज केल्यानंतर त्याच्यावर कोणत्याही राज्य सरकारचा अधिकार नसेल. फक्त त्याच्या संरक्षणाची जबाबदारी दिली असल्याने ही संपत्ती शत्रू राष्ट्राला हस्तांतरीत करण्याचा अधिकार नसेल, असेही नमूद करण्यात आले होते.
दरम्यान, सुषाभचंद्र बोस यांच्या मृत्यूचं गूढ अद्याप कायम आहे. 18 ऑगस्ट 1945 रोजी त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचं म्हटलं जातं. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या दोन समित्यांनी नेताजींचा अपघाती मृत्यू झाल्याचं अहवालात नमूद केलं होते. तर न्यायमूर्ती एम. के. मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने नेताजी या अपघातात बचावल्याचं दावा केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
सोलापूर
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)