एक्स्प्लोर
जवानांच्या 100 तुकड्या काश्मीरकडे रवाना, बिथरलेल्या अब्दुल्लांनी सरकारकडे स्पष्टीकरण मागितले
पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये तणावाची स्थिती आहे. अशा परिस्थितीत भारताने जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षाबलाच्या जवानांच्या 100 तुकड्या पाठवल्या आहेत. त्यामुळे नॅशनल कॉनफरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला बिथरले आहेत.

जम्मू : पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये तणावाची स्थिती आहे. अशा परिस्थितीत भारताने जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षाबलाच्या जवानांच्या 100 तुकड्या पाठवल्या आहेत. त्यामुळे नॅशनल कॉनफरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला बिथरले आहेत. अब्दुल्ला यांनी याबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे.
उमर अब्दुल्ला यांनी याबाबत ट्विटरवर माहित दिली आहे. ते म्हणाले आहेत की, फारुख अब्दुल्ला यांचे गृहमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. जवानांच्या 100 तुकड्या आणि राज्यात जारी करण्यात आलेल्या हाय अलर्टमुळे काश्मीरमधले लोक घाबरले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी अब्दुल्ला यंनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षाबलाच्या 100 तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. काश्मीरमधील नागरिकांना औषधे आणि गरजेच्या वस्तू घरी जमा करुन ठेवण्यास सांगितले आहे. तसेच जम्मू-काशमीरमधील पेट्रोल पंप चालकांना आदेश देण्यात आले आहेत की, खासगी वाहनांमध्ये केवळ तीन लीटर पेट्रोल आणि 10 लीटरच डीझेल भरले जावे. कोणालाही त्यापेक्षा जास्त पेट्रोल किंवा डिझेल भरता येणार नाही. तसेच गेल्या काही दिवसांत काश्मीर खोऱ्यांमध्ये 200 हून अधिक फुटीरतावादी नेत्यांना अटक केली आहे. त्यामुळे फारुख अब्दुल्ला बिथरले आहेत.
व्हिडीओ पाहा
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
भारत























