Queen Elizabeth II : महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर आज भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा
Queen Elizabeth II : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर आज भारतात राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार आहे. शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर खाली उतरवण्यात येतील.
Queen Elizabeth II : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांच्या निधनानंतर (Queen Elizabeth II Death) आज भारतात एक दिवसीय राष्ट्रीय दुखवटा (India Declares State Mourning) पाळला जाणार आहे. शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर खाली उतरवण्यात येतील. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या स्मृतीनिमित्त आणि त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी भारतात एक दिवसीय राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महाराणी एलिझाबेथ यांचं गुरुवारी 8 सप्टेंबर रोजी निधन झालं. त्या 96 वर्षांच्या होत्या. तब्बल 70 वर्षे ब्रिटनवर राज्य केल्यानंतर महाराणी एलिझाबेथ यांनी स्कॉटलंडमध्ये अखेरचा श्वास घेतला.
भारतात आज एक दिवसीय राष्ट्रीय दुखवटा
आज भारतात क्वीन एलिझाबेथ (Queen Elizabeth II) यांच्या स्मरणार्थ एक दिवसीय राष्ट्रीय दुखवटा (India Declares State Mourning) पाळण्यात येईल. या दिवशी सरकारी आणि राष्ट्रीय इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्या उंचीवर फडकण्यात येणार आहे. तसेच या दिवशी मनोरंजनाच्या कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार नाही. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचे गुरुवारी रात्री निधन झालं होतं. त्या 96 वर्षांच्या होत्या. 1952 साली त्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर आतापर्यंत म्हणजे 70 वर्षांपर्यंत त्या राजसत्तेवर होत्या.
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं 8 सप्टेंबरला निधन
महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. वाढतं वय आणि प्रकृती अस्वास्थामुळे एलिझाबेथ यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने आली होती. फार मोजक्याच कार्यक्रमात त्या उपस्थित राहत होत्या. वयोमानामुळे त्यांच्या शारिरीक हालचालींवरही बंधने आली होती. त्यानंतर शुक्रवारी त्यांचे निधन झालं.
महाराणी एलिझाबेथ या 7 दशकं महाराणी होत्या
एलिझाबेथ या फक्त ब्रिटनच्या महाराणी नाहीत. ब्रिटीश राष्ट्रकुल परिषदेतील कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जमैका, बार्बाडोस, बहामास, ग्रेनेडा, पापुआ न्यू गिनी, सॉलोमन बेट समूह, तुवालू, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स, बेलिझ, ॲंटिगा आणि बार्बुडा आणि सेंट किट्स आणि नेव्हिसया या 16 देशांची महाराणी होत्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Elizabeth II : भारताशी खास नातं; महाराणी एलिझाबेथ यांचा तीन वेळेस भारत दौरा
- King Charles-III: ब्रिटनचे राजे म्हणून महाराज चार्ल्स यांनी पदभार स्वीकारला