एक्स्प्लोर

King Charles-III: ब्रिटनचे राजे म्हणून महाराज चार्ल्स यांनी पदभार स्वीकारला

King Charles-III: ब्रिटीश सत्तेचे नवीन राजे म्हणून चार्ल्स यांनी अधिकृतपणे राजे म्हणून पदग्रहण केले.

King Charles-III: ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र चार्ल्स (King Charles-III) यांची महाराज म्हणून निवड करण्यात आली आहे. महाराज चार्ल्स तिसरे यांनी अधिकृतपणे आज पदभार स्वीकारला. सेंट जेम्स पॅलेसमधील बैठकीत चार्ल्स यांना अधिकृतपणे ब्रिटनचे राजे म्हणून जाहीर करण्यात आले. एका सोहळ्यात त्यांनी राजेपदाची शपथ घेतली. 

चार्ल्स यांना आज महाराज म्हणून जाहीर केले तरी त्यांचा राज्याभिषेक सोहळा काही दिवसांनी आयोजित करण्यात येईल. आज होणारा कार्यक्रम हा पदग्रहण सोहळा असणार आहे. राज्याभिषेक सोहळ्यासाठी विशेष तयारी केली जाते. या सोहळ्याचे विशेष नियोजन केले जाते. 

महाराणी एलिझाबेथ या ब्रिटनच्या सम्राज्ञी म्हणून सात दशके कार्यरत होत्या. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर ब्रिटीश राजघराण्याच्या नियमांप्रमाणे प्रिन्स चार्ल्स यांची निवड करण्यात आली.
ब्रिटनचे महाराज म्हणून शुक्रवारी पहिल्यांदा किंग चार्ल्स बर्मिंगहॅम पॅलेसमध्ये दाखल झाले होते. 

प्रिन्स चार्ल्स यांनी पत्नी कॅमिलासह लंडन येथे परतल्यानंतर ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान लिज ट्रस यांची भेट घेतली. तर, ब्रिटनला त्यांनी महाराजाप्रमाणे संबोधित केले. महाराज चार्ल्स यांनी आपल्या भाषणात दिवंगत महाराणी एलिझाबेथ यांचे आभार मानत आजीवन जनसेवेची शपथ घेतली. त्याशिवाय, बर्किंघम पॅलेस बाहेर असलेल्या लोकांची त्यांनी भेट घेत महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनावरील सात्वंना स्वीकारली. महाराणी एलिझाबेथ यांच्याप्रमाणे पुढे आपण काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले. 

या पदग्रहण सोहळ्यासाठी ब्रिटनच्या सर्व माजी पंतप्रधान, ज्येष्ठ खासदार, इतर अधिकारी उपस्थित होते.

महाराणींचे निधन, भारतात दुखवटा 

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (Queen Elizabeth Death II) यांच्या निधनानंतर भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. रविवारी, 11 सप्टेंबर रोजी भारतात राष्ट्रीय दुखवटा (One Day State Mourning) जाहीर करण्यात आला असून या दिवशी सरकारी आणि राष्ट्रीय इमारतींवर राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर ठेवण्यात येणार आहे. तसेच या दिवशी मनोरंजनाच्या कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार नाही. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, विद्यमान आमदाराचा राजीनामा
भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, विद्यमान आमदाराचा राजीनामा
सत्ता वाईट! पूर्वी जेवायला बोलवायचे, आता चहा प्यायलाही कोणी बोलवत नाही, सदाभाऊंनी व्यक्त केली खदखद
सत्ता वाईट! पूर्वी जेवायला बोलवायचे, आता चहा प्यायलाही कोणी बोलवत नाही, सदाभाऊंनी व्यक्त केली खदखद
Raver Loksabha : संतोष चौधरींच्या नाराजीवर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य; रावेरमधील बंड थंड होणार?
संतोष चौधरींच्या नाराजीवर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य; रावेरमधील बंड थंड होणार?
Telly Masala : IAS अधिकारी झाली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री ते देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री कोण?; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
IAS अधिकारी झाली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री ते देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री कोण?; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

PM Narendra Modi Speech Parbhani : महादेव जानकर माझे लहान भाऊ, परभणीच्या सभेत मोदींकडून कौतुकNashik Loksabha Election 2024 : नाशिकची जागा सेनेला तर राष्ट्रवादीला कुठली जागा मिळणार ?Jaysingh Mohite Patil on Uttamrao Jankar : तुम्हीही शब्द द्या...मोहितेंना काय म्हणाला कार्यकर्ता?Chanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचे अपडेट्स : 20 एप्रिल 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, विद्यमान आमदाराचा राजीनामा
भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, विद्यमान आमदाराचा राजीनामा
सत्ता वाईट! पूर्वी जेवायला बोलवायचे, आता चहा प्यायलाही कोणी बोलवत नाही, सदाभाऊंनी व्यक्त केली खदखद
सत्ता वाईट! पूर्वी जेवायला बोलवायचे, आता चहा प्यायलाही कोणी बोलवत नाही, सदाभाऊंनी व्यक्त केली खदखद
Raver Loksabha : संतोष चौधरींच्या नाराजीवर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य; रावेरमधील बंड थंड होणार?
संतोष चौधरींच्या नाराजीवर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य; रावेरमधील बंड थंड होणार?
Telly Masala : IAS अधिकारी झाली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री ते देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री कोण?; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
IAS अधिकारी झाली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री ते देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री कोण?; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
लखनौचा विजय अन् केएल राहुलची जबरदस्त खेळी; पत्नी अथियाने 3 शब्दात व्यक्त केली भावना!
लखनौचा विजय अन् केएल राहुलची जबरदस्त खेळी; पत्नी अथियाने 3 शब्दात व्यक्त केली भावना!
नोकरीचा राजीनामा दिला, पण लोकसभा न लढवण्याची घोषणा; कोणाला पाठिंबा देणार?, ज्योती मेटेंनी स्पष्टच सांगितलं
नोकरीचा राजीनामा दिला, पण लोकसभा न लढवण्याची घोषणा; कोणाला पाठिंबा देणार?, ज्योती मेटेंनी स्पष्टच सांगितलं
Bollywood Actress : ज्याच्यासाठी करिअरवर पाणी सोडलं त्यानं दारूच्या नशेनं रस्त्यावर आणलं; दिग्गज अभिनेत्रीची शोकांतिका
ज्याच्यासाठी करिअरवर पाणी सोडलं त्यानं दारूच्या नशेनं रस्त्यावर आणलं; दिग्गज अभिनेत्रीची शोकांतिका
'मोदी साहेबांचं भाषण ऐकलं, ते भाजपचेच पंतप्रधान वाटले, त्यांनी राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवावा'; शरद पवारांची तुफान फटकेबाजी!
'मोदी साहेबांचं भाषण ऐकलं, ते भाजपचेच पंतप्रधान वाटले, त्यांनी राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवावा'; शरद पवारांची तुफान फटकेबाजी!
Embed widget