Coronavirus Update : गेल्या 24 तासांत 15 हजारांहून कमी सक्रिय रुग्णांची नोंद, 400 हून अधिक मृत्यू
India Coronavirus Updates : देशात गेल्या 24 तासांत 14,306 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 443 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 18762 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
India Coronavirus Updates : देशात दरदिवशी 15 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 14,306 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 443 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 18762 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, म्हणजेच, 4899 सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत.
देशातील कोरोनाबाधितांची एकूण आकडेवारी
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 41 लाख 89 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 54 हजार 712 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 45 लाख 67 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या दोन लाखांहून कमी आहे. एकूण 1 लाख 67 हजार 695 रुग्णही अद्याप कोरोनावर उपचार घेत आहेत.
देशातील कोरोनाची स्थिती :
एकूण कोरोनाबाधित : तीन कोटी 41 लाख 89 हजार 774
एकूण कोरोनामुक्त : तीन कोटी 35 लाख 67 हजार 367
सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : एक लाख 67 हजार 695
कोरोनामुळे एकूण मृत्यू : चार लाख 54 हजार 712
एकूण लसीकरण : 102 कोटी 27 लाख 12 हजार लसीचे डोस
देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्ण केरळात
केरळमध्ये कोरोना व्हायरसच्या 8,538 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या वाढून 49 लाख 6 हजार 125 वर पोहोचली आहे. याव्यतिरिक्त 363 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 28,592 वर पोहोचला आहे.
राज्यातील रुग्णसंख्येत घट, गेल्या 24 तासांत 1410 नव्या रुग्णांची नोंद
राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख हळहळू खाली येताना दिसत आहे. राज्याच्या आरोग्य खात्याने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 1,410 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 18 जणांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात राज्यातील 1,520 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.46 टक्क्यांवर पोहोचलं आहे.
राज्यातील मृत्यूदरातही सातत्याने घट होत असून तो 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात आज 23,894 इतकी अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 7210 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यानंतर मुंबई (5075), ठाणे (3295) यांचा क्रमांक आहे. नंदुरबार जिल्ह्यात शून्य अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. जळगाव (17), धुळे (5), जालना (55), लातूर (46) परभणी (29), हिंगोली (22), नांदेड (18), अकोला (21), अमरावती (14), वाशिम (04), बुलढाणा (08), नागपूर (82), यवतमाळ (07), वर्धा (5), भंडारा (3), गोंदिया (3), गडचिरोली (6 ) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
सध्या राज्यात 1,91,401 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 903 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 17, 62 ,963 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 408 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 408 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 531 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,30,714 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत गेल्या 24 तासात सहा रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4356 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1328 दिवसांवर गेला आहे.