(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India China Trade : सीमेवर तणाव असतानाही भारत-चीनमधील व्यापार विक्रमी, 2021मध्ये 125 अब्ज डॉलरचा व्यापार
India China Trade : एकीकडे भारत - चीन देशांच्या सीमेवर तणाव कायम असताना दुसरीकडे दोन्ही देशांमधील व्यापार विक्रमी स्तरावर पोहोचला आहे.
India China Trade : सुमारे दोन वर्षांपासून भारत (India) आणि चीन (China) यांच्यात सीमेवर तणाव कायम आहे. एकीकडे दोन्ही देशांच्या सीमेवर (India China LOC Dispute) एकमेकांच्या विरोधात सैन्य तैनात केले आहे. हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजकीय पातळीवर बोलणी सुरू आहेत. मात्र, दुसरीकडे सीमा विवाद असूनही दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधात कोणतीही घट झालेली नाही. पूर्व लडाख प्रदेशात भारत आणि चीन यांच्यातील सीमा तणावाचा व्यापारावर कोणताही परिणाम झाला नाही आणि 2021 मध्ये दोन्ही देशांचा व्यापार 125 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला. या दरम्यान भारताची व्यापार तूटही वाढून 69 अब्ज डॉलर झाली आहे.
शुक्रवारी प्रकाशित झालेल्या व्यापार आकडेवारीनुसार, 2021 मध्ये चीनचा भारतासोबतचा एकूण व्यापार 125.66 अब्ज डॉलर इतका होता. 2020 सालच्या तुलनेत हा व्यापार 43.3 टक्क्यांनी जास्त आहे. ग्लोबल टाईम्सने चीनच्या सीमाशुल्क विभागाच्या माहितीच्या आधारे हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 दरम्यान चीनची भारतातील निर्यात 46.2 टक्क्यांनी वाढून 97.52 डॉलर अब्ज झाली आहे. त्या तुलनेत चीनची भारतातून आयात 34.2 टक्क्यांनी वाढून 28.14 डॉलर अब्ज झाली आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, 2021 मध्ये चीनमधून भारताच्या आयातीतील वाढीचा मोठा भाग वैद्यकीय उपकरणे आणि औषधांच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणार्या कच्च्या मालाचा होता. कोरोना महामारीच्या काळात भारताला मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय उपकरणांची गरज होती. भारत आणि चीनमधील द्विपक्षीय व्यापारातील ही वाढ या अर्थाने देखील लक्षणीय आहे की त्याच काळात पूर्व लडाख प्रदेशात सीमेवर दोन्ही देश अतिशय तणावपूर्ण परिस्थितीत होते. सध्या दोन्ही देशांनी सीमेवर एकमेकांविरुद्ध सैन्य अत्यंत सावध स्थितीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- India - China : कोणत्याही परिस्थितीसाठी सदैव तत्पर, भारतीय लष्करप्रमुखांचा चीनला इशारा
- Covid19 Vaccine : महाराष्ट्राकडे लसीचा पुरेसा साठा, लसीअभावी लसीकरणात अडचण नाही; केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण
- Boris Johnson Controversy : प्रिन्स फिलिप यांच्या अंत्यसंस्काराच्या पूर्वसंध्येला बोरिस जॉन्सन यांच्या कर्मचार्यांची पार्टी, सरकारने ब्रिटनच्या महाराणीची माफी मागितली
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha