(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Boris Johnson Controversy : प्रिन्स फिलिप यांच्या अंत्यसंस्काराच्या पूर्वसंध्येला बोरिस जॉन्सन यांच्या कर्मचार्यांची पार्टी, सरकारने ब्रिटनच्या महाराणीची माफी मागितली
Boris Johnson Controversy : ब्रिटनमध्ये राष्ट्रीय दुखवट्या दरम्यान पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या कर्मचाऱ्यांनी कोविड-19 आणि पक्षाचे नियम मोडले, त्यामुळे पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
Boris Johnson Controversy : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या कर्मचार्यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात कोविड-19 निर्बंध मोडून पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामुळे ब्रिटिश राजकारणात खळबळ उडाली होती. प्रिन्स फिलिप (Prince Philip) यांच्या अंत्यसंस्काराच्या पूर्वसंध्येला ही पार्टी करण्यात आली. कोविड निर्बंधांनंतर राणी एलिझाबेथ यांनी स्वतः प्रिन्सच्या अंत्यसंस्कारात भाग घेतला. त्यावेळी ब्रिटनमध्ये राष्ट्रीय दुखवटा होता, तरीही ब्रिटन सरकारकडून ही पार्टी आयोजित करण्यात आली याबद्दल शुक्रवारी सरकारने राणीची माफी मागितली. या मुद्द्यावरून सर्व विरोधी पक्ष पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, "हे सर्व राष्ट्रीय शोक दरम्यान घडले हे अतिशय खेदजनक आहे. याबाबत सरकारने राणीची माफी मागितली आहे." कोरोनामुळे, प्रिन्स फिलिपच्या अंत्यसंस्कारात केवळ 30 लोक सहभागी होऊ शकले. निर्बंधांमुळे राणीला चर्चच्या एका खोलीत एकटे बसावे लागले. तेथे उपस्थित सर्व लोकांनीही नियमांचे काटेकोरपणे पालन केले होते. त्यामुळेच पंतप्रधानांच्या कर्मचाऱ्यांचे हे प्रकरण समोर आल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे.
नुकतेच पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही या मुद्द्यावर संसदेत माफी मागितली. त्यानंतर राजकारण तीव्र झाले असून विरोधी पक्ष पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मुख्य विरोधी मजूर पक्षाच्या उपनेत्या अँजेला रेनर यांनी सांगितले की, "दु:खाच्या वेळी राणी एकटीच बसली होती आणि देशाच्या सर्व लोकांनी वैयक्तिक नुकसान होऊनही राष्ट्रीय हिताचे नियम पाळले. पंतप्रधान आणि कर्मचाऱ्यांच्या या वागणुकीसाठी आपल्याकडे शब्द नाहीत", असे रैना यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Covid19 Vaccine : महाराष्ट्राकडे लसीचा पुरेसा साठा, लसीअभावी लसीकरणात अडचण नाही; केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण
- Maharashtra Corona Update : कोरोनाचा विळखा घट्ट होतोय! राज्यात आज 43 हजार 211 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
- Immunity Booster : हिवाळ्यात अशी वाढवा रोगप्रतिकारशक्ती, 'या' फळांमधून शरीराला मिळतील सर्व आवश्यक व्हिटामिन्स
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha