IIM च्या विद्यार्थ्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र, पाहा नेमकं काय म्हटलय पत्रात...
आयआयएम (IIM) च्या विद्यार्थ्यांसह काही प्राध्यपकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी जातीअधारीत, हिंसाचाराविरोधात बोलण्याची विनंती पंतप्रधानांना केली आहे.

IIM Student Letter : भारतीय व्यवस्थापन संस्था अर्थात आयआयएम (IIM) च्या बंगळुरू आणि अहमदाबादच्या विद्यार्थ्यांसह काही प्राध्यपकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी जातीअधारीत हिंसाचाराविरोधात बोलण्याची विनंती पंतप्रधानांना केली आहे. देशात सध्या असिहुष्णतेचे वातावरण आहे. त्याविरोधात पंतप्रधान काहीच बोलत नाहीत. आपण याविरोध न बोलणे आम्हाला नाराज करणारे आहे असेही विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांना लिहलेल्या पत्रात 13 फॅकल्टी मेंबर्स आणि 183 विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी केल्या आहेत. या पत्रामध्ये हिंसक भाषण आणि अल्पसंख्याकांवर होत असलेला अत्याचार या मुद्यांवर भर देण्यात आला आहे.
नेमक काय म्हटलय पत्रात
आपल्या देशात वाढत असलेल्या असिहुष्णतेवर तुम्ही न बोलणे आम्हा सर्वांसाठीचं निराशाजणक आहे. मोदीजी तुम्ही या मुद्यांवर न बोलण्याने हिंसक भाषणाला प्रोत्साहीत केले आहे. त्यामुळे देशाच्या एकता आणि अखंडतेला धोका निर्माण झाला आहे. आता देशामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडेच काही चर्चसह पुजास्थळावर तोडफोड केली आहे. तसेच आमच्या मुस्लिम बंधू आणि भगिनींवर शस्त्र उचलण्याचे आव्हान केले जात आहे. या सर्व गोष्टी कायद्याला कोणत्याही प्रकारे न घाबरता केल्या जात आहेत. भारतीय संविधानाने सर्वांना आपले धार्मिक स्वतंत्र्य जपण्याचा अधिकार दिला आहे. कोणत्याही भितीशिवाय आपल्या धर्माचं आचरण करण्याचा अधिकार आपल्याला दिला आहे. पण आता आपल्या देशात एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे," असं या पत्रात म्हटलं आहे. आम्ही एक असा भारत निर्माण करण्याची इच्छा बाळगत आहोत की, ज्यामध्ये विविधता आणि सर्वसमावेशकता असेल आणि आपण एक पंतप्रधान म्हणून देशाला एका योग्य मार्गाने पुढे घेऊन जाल असे विद्यार्थ्यांनी या पत्रात म्हटले आहे.
हरिद्वारमध्ये भरलेल्या धर्मसंसदेत हिंसक, भडकावू भाषणे केल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. तसेच काही धार्मिक नेत्यांनी मुस्लिमांच्या विरोधात शस्त्र उचलण्याची भाषा केली आहे. हरिद्वारमध्ये 17 ते 19 डिसेंबरदरम्यान धर्मसंसद पार पडली होती. यामध्ये इस्लामिक भारतात सनातनचे भविष्य असा विषय ठेवण्यात आला होता. यावेळी स्वामी अमृतानंद, स्वामी सत्यव्रतानंद सरस्वती, महामंडलेश्वर यति नरसिंहानंद गिरी, स्वामी वेदांत प्रकाश सरस्वती, स्वामी परमानंद, स्वामी ललितानंद महाराज, पंडीत अधीर कौशिक यांच्याबरोबर अनेक राज्यातील जवळपास 500 धार्मिक नेते सामिल झाले होते.
हरिद्वारमध्ये दिलेल्या हिंसक भाषणानंतर देशातील ५ माजी प्रमुख सैनिकांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहले होते. तसेच अन्य १०० लोकांनी देखील पत्र लिहीत या घटनेचा निषेध केला होता. तसेच यामध्ये हरिद्वार आणि दिल्लीमध्ये झालेल्या धार्मिक कार्यक्रमात मुस्लिम समाजाच्या नरसंहाराची भाषा देखील करण्यात आली आहे. या सर्व गोष्टींचा या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान, अशा हिंसक वक्तव्याविरोधात जमीयत उलमा-ए-हिंद आणि सामाजिक कार्यकर्ता मौलाना सैयद महमूद असद मदनी यांनी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली आहे. तसेच मुस्लिम समाजाच्या विरोधात जी काही चिथावणीखोर वक्तव्य केली आहेत, त्यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी देखील केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
