एक्स्प्लोर
Advertisement
खुशखबर! ICICI बँकेच्या होम लोनवरील व्याज दरात कपात
नवी दिल्ली : आयसीआयसीआय (ICICI) या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेने नव्या ग्राहकांसाठी होम लोनच्या व्याजदरात 0.15 टक्क्यांनी कपात केली आहे. कालच भारतीय स्टेट बँकेने होम लोनवरील व्याजदरात कपात केली होती.
आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, महिला ग्राहकांसाठी 75 लाख रुपयांपर्यंतच्या होम लोनवर 9.15 टक्के व्याज आकारला जाईल. याआधी हा व्याज दर 9.30 टक्के होता. याबरोबर नोकरदार वर्गासाठी होम लोनवरील व्याज दर 9.35 टक्क्यांहून 9.20 टक्के करण्यात आले आहे.
आयसीआयसीआय बँकेचे होम लोनवरील नवे व्याज दर 2 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वीच स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) 75 लाख रुपयांपर्यंतच्या होम लोनवरील व्याज दरात 0.15 टक्के कपात केली होती. एसबीआयचं होम लोन 9.15 टक्के व्याज दरात उपलब्ध असून, महिला ग्राहकांसाठी व्याज दर 9.10 टक्के आहे.
बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, मोठ-मोठ्या बँकांनी होम लोनवरील व्याज दरात कपात केल्याने इतर बँकांवरही त्याचा दबाव वाढेल आणि पर्यायाने त्यांनाही व्याज दर कमी करावा लागेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement