एक्स्प्लोर
मी राजीनामा दिला नाही, नवज्योत कौर सिद्धूंचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली : भाजपचे राज्यसभा खासदार नवज्योत सिंह सिद्धू यांनी सोमवारी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर नवज्योत सिंह यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनीही राजीनामा दिल्याच्या अफवांना जोर आला. मात्र आपण भाजपला रामराम ठोकला नसल्याचं स्पष्टीकरण नवज्योत कौर यांनी दिलं आहे.
मी भाजप सोडलेलं नाही, पण भाजप चांगलं काम करत नाहीये, हेही तितकंच खरं आहे, असंही नवज्योत कौर सिद्धू म्हणाल्या. पती नवज्योत सिंह सिद्धू यांच्या राजीनाम्याविषयी मला सुरुवातीला माहिती नव्हती, मात्र राजीनामा देण्यास त्यांना भाग पाडल्याचा दावाही त्यांनी केला आहे. राजकारण हा माझ्यासाठी कधीच व्यवसाय नव्हता आणि नसेल असा टोलाही त्यांनी हाणला आहे.
पंजाबची सेवा करणं, हे सिद्धू यांचं कायमच उद्दिष्ट होतं. माझ्या दृष्टीने सरकार फारसं चांगलं काम करत नाहीये. अकाली दलाच्या साथीने जाण्याची त्यांना गरज नव्हती, असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.
सिद्धूचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा, 'आप'मध्ये प्रवेश?
'आप'ने पंजाबमध्ये मांडलेले मुद्दे योग्य असल्याचंही त्या म्हणाल्या. आमचं लक्ष्य पंजाबी नागरिकांच्या समस्या दूर करणं आणि पंजाबला वाचवणं हेच आहे. केजरीवाल पंजाबमध्ये चांगलं काम करत आहेत. आम्ही संधीसाधू नाही.' असं नवज्योत कौर सिद्धू यांनी स्पष्ट केलं आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement