एक्स्प्लोर

जेईएसमध्ये इव्हांकाच्या ड्रेसची चर्चा, मोदींची ट्रम्प कन्येला खास भेट

या भेटीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इव्हांका ट्रम्प यांना खास भेटही दिली.

हैदराबाद : अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी आणि सल्लागार इव्हांका ट्रम्प यांनी मंगळवारी हैदराबादमधील ग्लोबल एन्टरप्रिन्युअरशिप समिटमध्ये अर्थात जागतिक उद्योजक परिषदेत सहभाग नोंदवला. यावेळीत इव्हांका ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटही घेतली. पंतप्रधानांनी इव्हांकासाठी खास जेवणाचं आयोजनही केलं होतं. या कार्यक्रमात इव्हांका यांनी हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. अनेकांनी इव्हांका यांच्या लूकचं कौतुक केलं. तर काहींनी हे कोणत्या प्रकारचे कपडे असल्याचं म्हटलं. मंगळवारी रात्री दिलेल्या डिनरसाठी इव्हांका ट्रम्प यांनी प्रसिद्ध भारतीय फॅशन डिझायनर नीता लुल्लाने डिझाईन केलेला ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये सोनेरी धागे आणि धार्मिक शहर वाराणसीमध्ये तयार होणाऱ्या रेशमाचा वापर करण्यात आला होता. या भेटीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इव्हांका ट्रम्प यांना खास भेटही दिली. मोदींना इव्हांका यांना लाकडाचा एक बॉक्स भेट म्हणून दिला. या बॉक्सवर गुजरातमधील लोककलेचं पारंपरिक नक्षीकाम करण्यात आलं आहे. ह्या नक्षीकामाला सडेली क्राफ्ट नावानेही ओळखलं जातं. सूरतजवळच्या परिसरात ह्याचं काम केलं जातं. संध्याकाळी जेईएसमध्ये सहभागी झाल्यानंतर फलकनुमा पॅलेसमध्ये पंतप्रधान मोदींनी इव्हांका ट्रम्प यांच्यासाठी खास डिनरचं आयोजन केलं होतं. या डिनरमध्ये इव्हांका यांच्यासोबत ग्लोबल एन्टरप्रिन्युअरशिप समिटमध्ये आलेले 100 अतिमहत्त्वाचे पाहुणेही सहभागी झाले होते. इव्हांका ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह हैदराबादच्या ऐतिहासिक फलकनुमा पॅलेसमध्ये भारतीय पकवान्नांचा स्वाद घेतला. इव्हांका यांना भारताचे शाकाहारी पकवान्न वाढण्यात आले होते. निजामाच्या काळात मोठ्या टेबल अर्थात मेजसाठी प्रसिद्ध असलेलं ताज फलकनुमा पॅलेसचं रुपांतर आता हॉटेलमध्ये करण्यात आलं आहे. या पॅलेसचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या मेजवर एकाच वेळी 101 पाहुणे जेवण करु शकतात. जगातील सर्वात मोठा डायनिंग टेबल आहे. जेईएसमधल्या भाषणात इव्हांका ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जोरदार कौतुक केलं. चहावाला पंतप्रधान बनू शकतो म्हणजे बदल शक्य आहे, अशा शब्दात इव्हांका यांनी मोदींवर स्तुतीसुमनं उधळली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget