एक्स्प्लोर
तुम्ही अब्दुल्लाचं नाव ऐकलं आहे का? सरन्यायाधीश खेहर यांचा सवाल
अब्दुल्ला हा वहिदी मुसलमान होता. 28 सप्टेंबर 1871 रोजी अब्दुल्लाने कोलकाता हायकोर्टाचे चीफ जस्टिस जॉन पॅक्स्टन नॉर्मन यांच्यावर चाकूहल्ला केला.
नवी दिल्ली : 'तुम्ही अब्दुल्लाचं नाव ऐकलं आहे का?' असा सवाल करत सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश जे एस खेहर यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाला सुरुवात केली. सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष आर एस सुरी यांना उद्देशून हा प्रश्न होता. सुरी यांनी भाषणात स्वातंत्र्यलढ्यातील अनाम सैनिकांच्या सन्मानाचा उल्लेख केला होता.
'तुम्ही अब्दुल्लाचं नाव ऐकलं आहे का?' असा प्रश्न उपस्थित करुन खेहर यांनी स्वतःच त्याचं उत्तरही दिलं. 'अब्दुल्ला हा वहिदी मुसलमान होता. 28 सप्टेंबर 1871 रोजी अब्दुल्लाने कोलकाता हायकोर्टाचे चीफ जस्टिस जॉन पॅक्स्टन नॉर्मन यांच्यावर चाकूहल्ला केला. जजचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. अब्दुल्ला पळाला नाही, त्याने अटक करुन घेतली. ब्रिटीश सरकारकडून होणाऱ्या भेदभावामुळे तो नाराज होता. आपल्या जबाबात त्याने खंत व्यक्त केली होती' असं खेहर यांनी सांगितलं.
'या घटनेनंतर भारताचे राज्यपाल जनरल मायो यांनी सगळ्या वहिदी मुसलमानांचा नायनाट करण्याची घोषणा केली. बर्माहून परतताना मायो अंदमानला थांबले होते. तिथे 8 फेब्रुवारी 1872 रोजी शेर अली अफ्रिदी नावाच्या व्यक्तीने त्यांची चाकू खुपसून हत्या केली. शेर अलीसुद्धा वहिदी मुसलमान होता. त्याला सेल्युलर जेलमध्ये फाशी देण्यात आली. फाशीपूर्वी त्याने हिंदू आणि मुस्लिम कैद्यांना मिठाई वाटली होती.' असंही पुढे खेहर यांनी सांगितलं.
'मी एकदा शेर अली अफ्रिदीबद्दल विचारलं, तर काही लोकांनी मला पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीबद्दल सांगितलं. गव्हर्नर जनरल यांची हत्या करणाऱ्यांना आज कोणीही ओळखत नाही.' असंही सरन्यायाधीश म्हणाले.
'माझा जन्म केनियात झाला, त्यावेळी तो ब्रिटीशांच्या अखत्यारित होता. ब्रिटीशांना प्रथम श्रेणी नागरिक मानलं जायचं. त्यानंतर अमेरिकन आणि युरोपियन नागरिकांना दर्जा मिळत असे. त्यानंतर आफ्रिकन आणि अखेर आशियाई नागरिकांचा क्रमांक लागत असे. यानुसारच नोकरी आणि इतर सुविधा मिळत असत.' असंही खेहर म्हणाले.
'आज आपले राष्ट्रपती दलित कुटुंबातील आहे. पंतप्रधान पूर्वी चहा विक्रेते होते. मी कुठल्याही भेदभावाविना देशाचा सरन्यायाधीश झालो' अशा शब्दात खेहर यांनी तुम्ही जे कोणी आहात, त्याबद्दल अभिमान व्यक्त करण्याचा सल्ला दिला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement