एक्स्प्लोर
राहुल गांधी थांबलेल्या हॉटेलच्या सीसीटीव्हीत हार्दिक पटेल!
राहुल गांधी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलच्या सीसीटीव्हीत हार्दिक पटेल दिसत आहे.
अहमदाबाद : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पाटीदार नेता हार्दिक पटेलला सोमवारी गुजरात दौऱ्यावर असताना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही ऑफर हार्दिक पटेलने नाकारली. मात्र आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ज्यामुळे हार्दिक पटेल खोटं बोलला का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राहुल गांधी अहमदाबादेतील ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हार्दिक पटेलही दिसत आहे. त्यामुळे राहुल गांधींशी हार्दिक पटेलची भेट झाली का? आणि भेट झालेली असूनही आपण भेटण्याची ऑफर नाकारली, असं हार्दिक पटेल सांगत आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे.
दरम्यान एबीपी न्यूजने हार्दिक पटेलला याबाबत प्रश्न विचारला. मात्र आपण अहमदाबादमध्ये नसल्याचं त्याने सांगितलं.
आपण राजकारणात जाणार नाही, मात्र भाजपच्या पराभवासाठी काम करु, असं हार्दिक पटेलने म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेसशी वाढलेली जवळीक पाहता हार्दिक पटेलचा काँग्रेसला पाठिंबा आहे का, अशीही चर्चा गुजरातच्या राजकारणात सुरु आहे.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
भारत
क्रिकेट
Advertisement