एक्स्प्लोर
Advertisement
गुरुग्राममध्ये सशस्त्र दरोडा, 30 किलो सोेन्याची लूट
गुरुग्राम : उत्तर प्रदेशातील गुरुग्राममध्ये तब्बल 30 किलो सोन्याची चोरी करण्यात आली आहे. एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर जवळपास 6 ते 7 लोकांनी दरोडा टाकत सोन्याची लूट केली आहे. हा सर्व थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
गुरुग्राममधील मनी गोल्ड रत्नम या कंपनीच्या कार्यालयावर 6 ते 7 लोकांनी सशस्त्र दरोडा टाकला. सर्वात आधी चेहरा झाकलेले दोघेजण कंपनीच्या या कार्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांना अडवणाऱ्या दोन सुरक्षारक्षकांना दरोडेखोरांनी भोसकलं आहे. चेहरा झाकला असल्यामुळे चोरट्यांची ओळख पटवणं कठीण झालं आहे.
कंपनीत प्रवेश करताच चोरट्यांनी फोनच्या वायर आणि सीसीटीव्हीची वायर कापून टाकली. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना बंदी बनवत 30 किलो सोनं लूटून पोबारा केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
महाराष्ट्र
भविष्य
Advertisement