एक्स्प्लोर
बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी बाबा राम रहिमचा पॅरोलसाठी अर्ज
महत्वाची बाब म्हणजे हरियाणा विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर राम रहिमचा पॅरोल चर्चेचा विषय ठरत आहे.
नवी दिल्ली : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख, बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी बाबा राम रहिम याने शेतीच्या कामासाठी 42 दिवसांची पॅरोलची मागणी केली आहे. यासाठी राम रहिमकडून तुरुंग प्रशासनाकडे अर्ज करण्यात आला होता. राम रहिमच्या अर्जावरतुरुंग प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाला त्यासंदर्भात पत्र पाठवण्यात आलं आहे.
हरियाणाताली सुनरिया भागात शेतीच्या कामासाठी पॅरोल हवी असल्याचं त्याने अर्जात नमूद केलं आहे. तुरुंग प्रशासानाकडून जिल्हा प्रशासनाला पाठवण्यात आलेल्या पत्रात राम रहिम याची वर्तणूक ठिक असून, त्याने कुठल्याही नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचं म्हटलं आहे.
महत्वाची बाब म्हणजे हरियाणा विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर राम रहिमचा पॅरोल चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातच तुरुंगातल्या वर्तवणुकीचं भाजप मंत्र्यांकडूनही कौतुक करण्यात आलं आहे.
VIDEO | बाबा राम रहीमची शेतीच्या कामासाठी पॅरोलची मागणी | एबीपी माझा
राम रहीमसा तुरुंगवास का झाला होता?
2002 मधील साध्वी बलात्कार प्रकरणी 'डेरा सच्चा सौदा'चा प्रमुख बाबा राम रहीमला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंग यांनी स्वतः रोहतकच्या सुनारिया कारागृहात जाऊन शिक्षा ठोठावली.
साध्वी बलात्कार प्रकरणी 25 ऑगस्टला राम रहीमला दोषी ठरवण्यात आलं होतं. राम रहीमवर बलात्कार (कलम 376), धमकावणे (कलम 506) आणि कलम 511 अन्वये शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement