एक्स्प्लोर
Advertisement
नोएडामध्ये राम-रावण मंदिराची एकत्र स्थापना
ग्रेटर नोयडा : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये येत्या 11 ऑगस्ट रोजी रावणाच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. या मंदिरात लंकेश रावणासह राममंदिरही बांधले जाणार आहे. या दोन्ही मूर्तींची स्थापना 11 ऑगस्टला ग्रेटर नोएडामधील बिसरख धाममध्ये करण्यात येणार आहे. राम आणि रावणाचे एकच मंदिर असण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा दावा मंदिर प्रशासनाने केला आहे.
या मंदिराचे बांधकाम गेल्या 5 वर्षांपासून मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष अशोकानंदजी महाराज यांनी सांगीतलं. आता मूर्तींचं कामही पूर्ण झाल्यामुळे 11 ऑगस्ट रोजी त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल.
या मंदिरात गणपती, राम परिवार मंदिर, राधाकृष्ण मंदिर, दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर, शनि मंदिर, आदी मंदिरांचाही समावेश असेल. ऋषी विश्रवा यांच्या तपश्चर्येचे ठिकाण आणि रावणाच्या जन्मस्थानी रावणाचे हे भव्य मंदिर बांधले जाईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
भारत
क्रीडा
Advertisement