एक्स्प्लोर
पीएफ, एनएसएस सारख्या अल्पबचत योजनांच्या व्याजदरात कपात
नवी दिल्ली : राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (नॅशनल सेव्हिंग स्कीम) आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) सारख्या अल्पबचत योजनांच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. नॅशनल सेव्हिंग स्कीम आणि पीपीएफचे व्याजदर 7.9 टक्क्यांवरुन 7.8 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहेत.
कमी करण्यात आलेले हे दर 1 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीसाठी लागू असतील. म्हणजेच 30 जूनपर्यंत या बचत योजनांमध्ये जमा करण्यात आलेल्या रकमेवर जुना व्याजदर मिळेल. तर 1 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत जमा करण्यात येणाऱ्या रकमेवर घटवण्यात आलेला व्याजदर मिळेल.
योजना | व्याज दर (टक्क्यांमध्ये) (1 एप्रिल ते 30 जून 2017) | व्याज दर (टक्क्यांमध्ये) (1 जुलै ते 30 सप्टेंबर 2017) |
बचत ठेवी (सेव्हिंग्ज डिपॉझिट) | 4 | 4 |
एक वर्षाची मुदत ठेव | 6.9 | 6.8 |
दोन वर्षांची मुदत ठेव | 7 | 6.9 |
तीन वर्षांची मुदत ठेव | 7.2 | 7.1 |
पाच वर्षांची मुदत ठेव | 7.7 | 7.6 |
पाच वर्षांची आरडी | 7.2 | 7.1 |
पाच वर्षांची सिनिअर सिटीझन सेव्हिंग स्कीम (ज्येष्ठ नागरिक बचत योजना) | 8.4 | 8.3 |
पाच वर्षांचं राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएसएस) | 7.9 | 7.8 |
प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) | 7.9 | 7.8 |
किसान विकास पत्र | 7.6 (113 महिने) | 7.5 (115 महिने) |
सुकन्या समृद्धी योजना | 8.4 | 8.3 |
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement