एक्स्प्लोर
डॉ. अभय आणि राणी बंग यांना पद्मश्री, धोनीला पद्मभूषण!
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणाऱ्या ‘पद्म’ पुरस्कारांची आज (गुरुवार) घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील डॉ. अभय बंग, राणी बंग यांना आरोग्य क्षेत्रातील कार्यासाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
![डॉ. अभय आणि राणी बंग यांना पद्मश्री, धोनीला पद्मभूषण! government announces padma awards, Padma Shri award to Dr Abhay and Rani Bang latest update डॉ. अभय आणि राणी बंग यांना पद्मश्री, धोनीला पद्मभूषण!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/25160408/Padma-Award.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणाऱ्या ‘पद्म’ पुरस्कारांची आज (गुरुवार) घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील डॉ. अभय बंग, राणी बंग यांना आरोग्य क्षेत्रातील कार्यासाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
संगीतकार इलाई राजा आणि गुलाम मुस्तफा खान यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी आणि बिलियर्ड्सपटू पंकज अडवाणी यांची पद्मभूषणसाठी निवड करण्यात आली आहे.
यावर्षी एकूण 85 पद्म पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये 3 पद्मविभूषण, 9 पद्मभूषण आणि 73 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यासह 14 माहिला तर 16 हे अप्रवासी भारतीय, परदेशी नागरिक आहेत. 3 मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.
यंदा 85 पैकी 11 पुरस्कारांवर महाराष्ट्राने मोहर उमटवली.
याशिवाय साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य कार्यबद्दल अरविंद गुप्ता, क्रीडाजगतात दिलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्रातील मुरलीकांत पेटकर आणि विजयालक्ष्मी नवनित कृष्ण यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तर संपत रामटेके यांना मरणोत्तार पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
केंद्र सरकारकडून पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिवसाच्या पूर्वसंध्येला करण्यात येते. यंदाच्या वर्षात पुरस्कारासाठी 15,700 लोकांनी अर्ज केला होता. त्यातील काही जणांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
मध्य प्रदेशमधील भज्जू श्याम, केरळच्या लक्ष्मी कुट्टी, पश्चिम बंगालच्या सुधांशू बिस्वास, केरळच्या एमआर राजगोपाल यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
कला, साहित्य, शिक्षा, खेळ, चिकित्सा आणि सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार, उद्योग अशा क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा या पुरस्कारानं सन्मान करण्यात येतो.
पद्मविभूषण पुरस्कार 2018-
- इलाई राजा (संगीतकार )
- गुलाम मुस्तफा खान (शास्त्रीय गायक)
- परमेश्वरन (ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ )
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)