एक्स्प्लोर
Advertisement
सोन्याच्या दरात घसरण, दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांची झुंबड
मुंबई : दसरा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक. हा मुहूर्त साधत देशभरात ग्राहकांनी सोने खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे. बाजारपेठेत ज्वेलर्सच्या दुकानात सोने खरेदीदारांची लगबग पाहायला मिळत आहे.
राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये सराफांच्या दुकानांमध्ये ग्राहकांनी गर्दी केली आहे. सध्या एक तोळे सोन्याचा दर 30 हजार रुपयांच्याही खाली आला आहे. त्यामुळे खरेदीदार चांगलेच सुखावले आहेत.
आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे गेल्या तीन महिन्यात सोन्या-चांदीचे दर घसरल्याचं जाणकार सांगतात. सोन्यासोबतच दसऱ्याच्या मुहुर्तावर घर, वाहन खरेदी करण्याकडेही नागरिकांचा ओघ दिसून येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अमरावती
ठाणे
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement