एक्स्प्लोर
Advertisement
आंबा,काजू,पपई, अननस, गोव्यात वाईन फेस्टिव्हलची धूम
गोवा पर्यटन खाते आणि गोवा पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी)तर्फे पणजी येथील डी. बी. बांदोडकर मैदानावर आयोजित ‘ग्रेप एक्सपेड’ महोत्सवाचे उद्धाटन गुरुवारी रात्री मोठ्या उत्साहात करण्यात आले.
पणजी: चिकन काफ्रीयाल, तिसऱ्याचे सके, इस्वण रवा फ्राय, सुंगटाची करी, कुर्ल्याचे सके, चिकन कबाब आणि तोंडाला पाणी सुटेल असे चमचमीत गोवन खाद्यपदार्थांवर गोवन संगीताच्या तालावर वाइनच्या पेग बरोबर एन्जॉय करत खा, प्या,मजा कराचा अनुभव स्थानिक आणि पर्यटक पणजी येथे सुरु झालेल्या वाइन फेस्टिव्हलमध्ये घेत आहेत.
गोवा पर्यटन खाते आणि गोवा पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी)तर्फे पणजी येथील डी. बी. बांदोडकर मैदानावर आयोजित ‘ग्रेप एक्सपेड’ महोत्सवाचे उद्धाटन गुरुवारी रात्री मोठ्या उत्साहात करण्यात आले.
महोत्सवाच्या माध्यमातून गोव्यातील वाईन आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या काजू महोत्सवाला लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
वेगवेगळ्या महोत्सवांतून गोव्याचे संगीत, खाद्यपदार्थ आणि पेय ही राज्याची संस्कृती राष्ट्रीय स्तरावर पुढे घेऊन जात आहेत. गोव्याला पर्यटन क्षेत्रात प्रथम क्रमांकावर आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.
दर्यासंगमवर सुरु असलेल्या ‘ग्रेप एक्सपेड’या चार दिवसीय महोत्सवात गोव्या बाहेरील आणि गोव्यातील लोकांनी आंबा,काजू,पपई, अननस, जांभूळ आदी फळांपासून बनवलेल्या वाईन्स चाखण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.
या महोत्सवात गोव्याचे पारंपरिक अन्न, गोव्याच्या संस्कृतीची झलकही अनुभवण्यास मिळणार आहे. महोत्सवात खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल्स् उभारण्यात आले आहेत.
स्थानिकांबरोबरच देशी-विदेशी पर्यटकांची मोठी उपस्थिती महोत्सवाला लाभणार असून, हा महोत्सव 22 एप्रिलपर्यंत सर्वांसाठी खुला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement