एक्स्प्लोर
Advertisement

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी विश्वासमत जिंकलं
प्रमोद सावंत यांच्या बाजूने 20 आमदारांनी मतदान केलं. तर 15 जण त्यांच्या विरोधात गेले. त्यामुळे सावंत यांच्या मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब झालं.

पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये 'मगो'चे सुदिन ढवळीकर आणि 'गोवा फॉरवर्ड'च्या विजय सरदेसाई यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप आघाडी सरकार स्थिर राहावं, यासाठी दोन उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला भाजपने स्वीकारला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला.
भाजपने प्रमोद सावंत हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना विजय सरदेसाई आणि सुदिन ढवळीकर यांना उपमुख्यमंत्रीपदे देण्यात आली असल्याची घोषणा केली होती. आज संध्याकाळी त्याचा आदेश जारी करण्यात आला.
दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. सावंत यांच्या बाजूने 20 आमदारांनी मतदान केलं. तर 15 जण त्यांच्या विरोधात गेले. त्यामुळे सावंत यांच्या मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब झालं. महाराष्ट्र गोमांतक, गोवा फॉरवर्ड आणि अपक्षांनी साथ दिल्याने सावंत यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला.
मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर भाजपने प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली. हे पद कायम राखण्यासाठी सावंत यांना विश्वासदर्शक ठराव जिंकणं गरजेचं होतं. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूनं 20 आमदारांनी मतदान केल्यानं सावंत यांचं मुख्यमंत्रिपद कायम राहणार आहे.
भाजपच्या 11, महाराष्ट्र गोमांतकच्या 3, गोवा फॉरवर्डच्या 3 आमदारांसह 3 अपक्षांनी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूनं मतदान केलं. तर काँग्रेसच्या 14, एनसीपी (चर्चिल आलेमाव) एका आमदारानं ठरावाच्या विरोधात मतदान केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
