एक्स्प्लोर
पेट्रोल पुन्हा महागलं, 11 दिवसात 2 रुपये 17 पैशांनी दरवाढ
आज पेट्रोल 14 पैसे आणि डिझेल 15 पैशांनी महागलं. मुंबईत पेट्रोलचा दर 88 रुपये 26 पैसे तर डिझेल 77 रुपये 47 पैसे प्रतिलीटर आहे.
![पेट्रोल पुन्हा महागलं, 11 दिवसात 2 रुपये 17 पैशांनी दरवाढ Fuel prices continue to rise: petrol price increases by 14 paisa and diesel by 15 paisa today पेट्रोल पुन्हा महागलं, 11 दिवसात 2 रुपये 17 पैशांनी दरवाढ](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/04/30205803/petrol-PTI-580x350.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: पेट्रोल-डिझेलची दरवाढ आजही सुरुच आहे. आज पेट्रोल 14 पैसे आणि डिझेल 15 पैशांनी महागलं. मुंबईत पेट्रोलचा दर 88 रुपये 26 पैसे तर डिझेल 77 रुपये 47 पैसे प्रतिलीटर आहे. दररोज वाढणाऱ्या पेट्रोलची वेगाने शंभरीकडे कूच सुरु आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा संतापाचा पाराही त्याच वेगाने चढत आहे. गेल्या 11 दिवसात पेट्रोल तब्बल 2 रुपये 17 पैशांनी महागलं आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर दररोज वाढत असताना, केंद्र सरकारने इंधनाचे दर आपल्या हातात नसल्याचं म्हटलं आहे. तर विरोधकांनी पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी लावून धरली आहे.
या महिन्याच्या सुरुवातीपासून सलग अकराव्या दिवशी ही दरवाढ आहे.
महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल परभणीत आहे. परभणीत पेट्रोलचा आजचा दर 90.05 रुपये लिटर आहे. तर डिझेल 78 रुपये लिटर प्रमाणे मिळतंय.
दुसऱ्या नंबरवरील अमरावतीत आजचा पेट्रोलचा दर 89.51 रुपये इतका आहे. तर अमरावतीत डिझेल 78.75 रुपये लिटर आहे.
...तर पेट्रोल 55, डिझेल 50 रुपये प्रतिलीटरने मिळेल- गडकरी
पेट्रोल दराने शंभरी गाठायला आता फक्त 10 रुपयांची गरज आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या संतापाचा पाराही दिवसेंदिवस वाढत आहे. इंधन दरवाढीमुळे भाजीपाला आणि दैनंदिन आयुष्यातील इतर वस्तूही 5 ते 8 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
11 दिवसात पेट्रोल 2 रु 17 पैशांनी महागलं
गेल्या 11 दिवसात पेट्रोल सातत्याने महागतंय. या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 सप्टेंबरला मुंबईतील पेट्रोल दर 86.09 रुपये प्रति लिटर इतका होता. आज हाच दर 88.26 रुपये झाला आहे. त्यामुळे गेल्या 11 दिवसात पैशात वाढणाऱ्या पेट्रोलमध्ये प्रत्यक्षात 2 रुपये 17 पैशांची वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या शहरातील पेट्रोलचे दर
मुंबई
पेट्रोल- 88.26 रुपये
डिझेल 77.47 रुपये
परभणी
पेट्रोल 90.05 रुपये
डिझेल 78.00 रुपये
अमरावती
पेट्रोल – 89.51
डिझेल – 78.75
सोलापूर
पेट्रोल – 89.31
डिझेल – 78.09
औरंगाबाद
पेट्रोल 89.31 रुपये
डिझेल 78.52 रुपये
नांदेड
पेट्रोल 89.84 रुपये
डिझेल 77.83 रुपये
पुणे –
पेट्रोल 88.05 रुपये
डिझेल 76.07 रुपये
ठाणे –
पेट्रोल रुपये
डिझेल रुपये
नाशिक –
पेट्रोल 88.63 रुपये
डिझेल 76.64रुपये
नागपूर –
पेट्रोल 88.74 रुपये
डिझेल 77.99 रुपये
जळगाव
पेट्रोल 89.23 रुपये
डिझेल 77.21 रुपये
नंदुरबार
पेट्रोल 88.94रुपये
डिझेल 76.91 रुपये
धुळे
पेट्रोल 88.18 रुपये
डिझेल 76.22 रुपये
संबंधित बातम्या
...तर पेट्रोल 55, डिझेल 50 रुपये प्रतिलीटरने मिळेल- गडकरी
चंद्राबाबूंचा आंध्रवासियांना दिलासा, पेट्रोल-डिझेल 2 रुपयांनी स्वस्त
भारत बंद, तरीही पेट्रोल दरवाढ चालूच!
पेट्रोलची टिच्चून आगेकूच, शतकापासून 12 रुपये दूर!
पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरुच, अमरावती, सोलापुरात महाग पेट्रोल इंधन दरवाढीचा फटका, भाजीपाला दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ स्पेशल रिपोर्ट @830 | पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला, 'अच्छे दिन'चं स्वप्न हवेतच डिझेलच्या दरात विक्रमी वाढ, पेट्रोलही महागलंअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सिंधुदुर्ग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)