एक्स्प्लोर

LIVE : अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी काल वयाच्या 93 व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

नवी दिल्लीदेशाच्या राजकाराणातील महाऋषी, भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन झाले. संध्याकाळी पाचच्या सुमारास वाजपेयींवर दिल्लीतील राष्ट्रीय स्थळी अंत्यसंस्कार करण्यात आले.  मानसकन्या नमिता भट्टाचार्यने वाजपेयींच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. अजातशत्रू, हळव्या मनाचा कवी, अभ्यासू पत्रकार, दिलदार आणि जिंदादिल राजकारणी असलेल्या वाजपेयींना निरोप देण्यासाठी देशा-विदेशातील मान्यवरांची पावलं, स्मृतीस्थळाकडे वळली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, भाजपाध्यक्ष अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेते अंत्यविधीला उपस्थित होते. दुसरीकडे भूतानचे राजा वांगचूक, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझई यांनीदेखील वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली. वाजपेयींना अखेरचा निरोप देताना मोदी, अडवाणी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना अक्षरश: अश्रू अनावर झाले.
LIVE : अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन

LIVE UPDATE

4.55 PM मानसकन्या नमिता भट्टाचार्यने वाजपेयींच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

3.55 PM अटल बिहारी वाजपेयी यांचं पार्थिव स्मृतीस्थळी दाखल

2.30 PM - अटल बिहारी वाजपेयींच्या अंत्ययात्रेत मोठी गर्दी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंत्ययात्रेत सहभागी

2.00 PM  अलोट गर्दीत वाजपेयींचा अखेरचा प्रवास सुरु, भाजप मुख्यालयातून अंत्ययात्रेला सुरुवात

12.30 PM : अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याकडून अटलजींच्या पार्थिवाचं दर्शन

LIVE : अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन

12.05 PM : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी आणि पुत्र आदित्य यांच्यासह वाजपेयींच्या अंत्यदर्शनासाठी भाजप मुख्यालयात

LIVE : अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन

12.05 PM : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी वाजपेयींच्या अंत्यदर्शनाला

LIVE : अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन

11.35 AM : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वाजपेयींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन

LIVE : अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन

11.10 AM : केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल राम नाईक वाजपेयींच्या अंत्यदर्शनाला

11.05 AM : भाजपाध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून वाजपेयींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन 11.05 AM : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अटल बिहारी वाजपेयींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं LIVE : अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन 10.55 AM : अटल बिहारी वाजपेयी यांचं पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल, पंतप्रधान मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित LIVE : अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन 10.25 AM : अटल बिहारी वाजपेयी यांचं पार्थिव भाजप मुख्यालयाच्या दिशेने रवाना, मार्गात समर्थकांची गर्दी LIVE : अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन 10.00 AM : अटल बिहारी वाजपेयी यांचं पार्थिव भाजप मुख्यालयाच्या दिशेने रवाना LIVE : अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन 08.55 AM: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू वाजपेयींच्या अंत्यदर्शनाला 08.45 AM: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून वाजपेयींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन 08.35 AM: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांच्याकडून वाजपेयींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन 08.15 AM: वाजपेयींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात भाजप मुख्यालयात जाणार 08. 00 AM : सरसंघचालक मोहन भागवत अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी. LIVE : अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन 07.40 AM:  भाजपाध्यक्ष अमित शाह पुन्हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या निवासस्थानी. गीतकार जावेद अख्तर, अभिनेत्री शबाना आझमीही पार्थिवाच्या अंत्यदर्शनाला 06.15 AM: अटलजींच्या अंत्ययात्रेसाठी निवासस्थानाबाहेर फुलांनी सजवलेला रथ सज्ज करण्यात आला. 66 दिवसांपासून रुग्णालयात अटल बिहारी वाजपेयी यांना 11 जून 2018 रोजी उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. किडनीच्या आजारामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. वाजपेयी 2009 सालापासूनच आजारी होते. त्यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हिलचेअरचा वापर करावा लागत असे. अटल बिहारी वाजपेयी हे डिमेंशिया आजाराने त्रस्त होते. जिंदादिल राजकारणी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे देशाच्या पंतप्रधानपदी तीनवेळा विराजमान झालेच, मात्र एक जिंदादिल राजकारणी म्हणूनही त्यांचं व्यक्तिमत्त्व कायम जनतेसमोर आलं. वाजपेयींच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. हळूवार मनाचा कवी, सेवाभावी माणूस, सौम्य हिंदुत्त्व अशा अनेक गोष्टींनी त्यांचं आयुष्य व्यापलं होतं. अटल बिहारी वाजपेयी मोठ्या कालावधीपासून राजकीय जीवनापासून दूर होते. तीन वेळा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी तीनवेळा भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. पहिल्यांदा 1996 मध्ये ते पंतप्रधान झाले. मग 1998 आणि 1999 ते 2004 या काळात त्यांनी पंतप्रधानपद भूषवलं. पत्रकार, राजकारणी, कवी, लेखक वाजपेयी हे केवळ राजकारणी नव्हते, तर त्यांची पत्रकार, कवी, लेखक अशीही ओळख होती. राजकारणात येण्यापूर्वी ते पत्रकार होते. काश्मीरमध्ये परमिट सिस्टम लागू करण्यात आलं होतं, तेव्हा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींसोबत पत्रकार म्हणून वाजपेयी काश्मीरला गेले होते. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा नजरकैदेत असताना मृत्यू झाला. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी राजकारणात येण्याचं निश्चित केलं. दरम्यानच्या काळात त्यांनी कवी, लेखक म्हणूनही नाव कमावलं होतं. भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी यांना मोदी सरकारने 2015 मध्ये देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारत रत्नने गौरवलं. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना घरी जाऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचवेळी त्यांचा अनेक वर्षांनी फोटो समोर आला होता.

संबंधित बातम्या 

राष्ट्रीय स्मृती स्थळ इतकं महत्त्वाचं का?
पाकिस्तान दौऱ्यापूर्वी वाजपेयींनी गांगुलीला 'हे' गाणं ऐकवलं
अटल बिहारी वाजपेयींच्या प्रेरणादायी कविता
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची संपत्ती...
जेव्हा अटलजी पंढरपुरात विठ्ठलदर्शनासाठी आले होते...
सिनेमा, गाणी, रंग, खेळ, कवी... वाजपेयींच्या आवडी-निवडी काय होत्या?
वाजपेयींचं निधन, ‘कारगिल’ हरलेल्या पाकिस्तानची प्रतिक्रिया
मी अविवाहित, पण ब्रम्हचारी नाही, छातीठोकपणे सांगणारे वाजपेयी
मी नि:शब्द आणि शून्यात, मोदींची प्रतिक्रिया, वाजपेयींच्या निधनाने देश हळहळला
आणखी एक भीष्म पितामह गमावला, उद्धव ठाकरेंकडून शोक व्यक्त
अटल बिहारी वाजपेयींना जडलेला डिमेन्शिया नेमका काय?
हेमा मालिनीचा 'सीता और गीता' वाजपेयींनी 25 वेळा पाहिला!
जीवनपट प्रदर्शित होण्यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी कालवश
अटल बिहारी वाजपेयी यांनी शेवटचं भाषण कधी केलं?
अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी निगडीत 15 रंजक गोष्टी
वाजपेयींमुळे मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो: मनोहर जोशी
राजकारणातला महाऋषी हरपला, अटल बिहारी वाजपेयींचं निधन
हार नहीं मानूँगा, रार नयी ठानूँगा; वाजपेयी-हळव्या मनाचे कवी आणि पत्रकार
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
Embed widget