एक्स्प्लोर
महिलांचा जन्म केवळ पुरुषांना खुश करण्यासाठी नाही : सुप्रीम कोर्ट
मुस्लिम समाजातील खतना प्रथेविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने कान टोचले.
नवी दिल्ली : महिलांचा जन्म हा केवळ पुरुषांना खुश करण्यासाठी नसल्याचं परखड मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं आहे. मुस्लिम समाजातील खतना प्रथेविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने कान टोचले.
दाऊदी बोहरा मुस्लिम धर्मातील खतना ही प्रथा बंद करण्यात यावी, यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. केंद्र सरकारनेही या प्रथेवर बंदी आणण्याची मागणी करत धर्माच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा खतना करणं गुन्हा असल्याचं म्हटलं आहे.
स्त्रियांचे आयुष्य फक्त लग्न करणं किंवा पतीच्या सुखासाठी नसतं. लग्न आणि संसाराशिवायही महिलांच्या इतर जबाबदाऱ्या असतात. खतनासारख्या अनिष्ट प्रथा महिलांच्या गुप्ततेचा अधिकार उल्लंघन करणाऱ्या आहेत. ही प्रथा लैंगिक संवेदनशीलता आणि आरोग्यासाठीही हानीकारक असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं.
महिलांच्या खतना प्रथेवर बंदी आणली जावी या मताचं सरकार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. अल्पवयीन मुलीचा खतना केल्यास सात वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाचीही तरतूद करण्यात आल्याचंही केंद्राने म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
कोल्हापूर
सोलापूर
महाराष्ट्र
Advertisement