(Source: Poll of Polls)
...अखेर ट्विन टॉवर्स जमीनदोस्त! तीन अग्नी, 12 ब्रह्मोस आणि चार पृथ्वी क्षेपणास्त्रांइतक्या स्फोटकांचा वापर
Twin Towers Demolition : नोएडा येथील ट्विन टॉवर रविवारी पाडण्यात आले. स्फोटानंतर काही सेकंदातच ही मोठी इमारत पत्त्याच्या घरासारखी कोसळली. हा टॉवर पाडण्यासाठी तब्बल 20 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
Twin Towers Demolition : उत्तर प्रदेशमधील नोएडा (Noida) येथील ट्विन टॉवर (Supertech Twin Towers) आज पाडण्यात आला. कुतुबमिनारपेक्षा उंच असणारी ही इमारत पाडण्यासाठी 3 हजार 500 किलोपेक्षा जास्त स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. ट्विन टॉवर पाडण्यासाठी वापरण्यात आलेल्या स्फोटकांचे प्रमाण अग्नी-V क्षेपणास्त्राच्या तीन वॉरहेड्स किंवा ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या 12 आणि चार पृथ्वी क्षेपणास्त्रांच्या बरोबरीचे आहे.
दिल्लीतील कुतुबमिनारपेक्षा उंच असलेल्या नोएडा सेक्टर 93A मधील सुपरटेक ट्विन टॉवर आज पाडण्यात आला. हा टॉवर पाडण्यासाठी तब्बल 20 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
नोएडा येथील ट्विन टॉवर रविवारी पाडण्यात आले. स्फोटानंतर काही सेकंदातच ही मोठी इमारत पत्त्याच्या घरासारखी कोसळली. सर्वोच्च न्यायालयाने हे बेकायदेशीरपणे बांधलेले ट्विन टॉवर पाडण्याचे आदेश दिल्यानंतर वर्षभरानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. सुमारे 100 मीटर उंचीचा हा टॉवर काही सेकंदात जमीनदोस्त झाला. सुपरटेक ट्विन टॉवर्स पाडण्यासाठी 3,500 किलोपेक्षा जास्त स्फोटकांचा वापर करण्यात आला. ट्विन टॉवर पाडण्यासाठी वापरण्यात आलेल्या स्फोटकांचे प्रमाण अग्नि-V क्षेपणास्त्राच्या तीन वॉरहेड्स, ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या 12 किंवा चार पृथ्वी क्षेपणास्त्रांच्या बरोबरीचे आहे.
अग्नि-व्ही
अग्नि-V ICBM हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन, विकास संस्था (DRDO) आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड यांनी विकसित केले आहे. त्याचे वजन जवळपास 50 हजार किलोग्रॅम आहे. हे क्षेपणास्त्र 1.75 मीटर उंच असून त्याचा व्यास दोन मीटर आहे. हे क्षेपणास्त्र ध्वनीच्या वेगापेक्षा 24 पट अधिक वेगवान असून 8.16 किलोमीटर प्रति सेकंद प्रवास करते. 29,401 किलोमीटर प्रति तास इतका या क्षेपणास्त्राचा वेग आहे. हे क्षेपणास्त्र रिंग लेझर जायरोस्कोप इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टम (NavIC) ने सुसज्ज आहे. जे उपग्रह मार्गदर्शनासह कार्य करते. हे क्षेपणास्त्र आपल्या लक्ष्यावर अचूक मारा करू शकते, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे.
ब्राह्मोस क्षेपणास्त्र
ब्रह्मोस 300 किलोग्रॅम (पारंपारिक आणि आण्विक दोन्ही) वारहेड वाहून नेण्यास सक्षम आहे आणि त्याचा सुपरसॉनिक वेग मॅक 2.8 ते 3 (ध्वनी वेगाच्या अंदाजे तिप्पट) आहे. या उड्डाण चाचणीचे टेलीमेट्री, रडार आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टीमसह रेंज इन्स्ट्रुमेंटेशनच्या सर्व सेन्सर्सद्वारे परीक्षण केले गेले आहे.
ब्रह्मोस क्षेपणास्त्र हा भारताचा DRDO आणि रशियाचा NPOM यांचा संयुक्त उपक्रम आहे. सामर्थ्यशाली, अत्यंत अष्टपैलू ब्रह्मोसचे समुद्र आणि जमिनीवरील लक्ष्यांवर परिणामकारकता आणि प्राणघातकता वाढवण्यासाठी त्याचे सातत्याने अपग्रेडेशन करणे हा यामागचा उद्देश आहे.
ब्रह्मोस ही एक शक्तिशाली क्षेपणास्त्र शस्त्र प्रणाली आहे, जी आधीच सशस्त्र दलांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. लष्कर, वायुसेना आणि नौदलाद्वारे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये ते वापरले जाते. हे पाणबुडी, जहाजे, विमाने किंवा लँड प्लॅटफॉर्मवरून प्रक्षेपित केले जाऊ शकते.
पृथ्वी क्षेपणास्त्र
पृथ्वी हे एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम (IGMDP) अंतर्गत भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेद्वारे (DRDO) विकसित करण्यात आले आहे. पृथ्वी हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. ते भारताच्या स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडद्वारे तैनात केले जाते.