एक्स्प्लोर
पैशांची अफरातफर, निलंबित अधिकारी नितीश ठाकूरला अटक
नितीश ठाकूरच्या प्रत्यार्पणाची कारवाई सुरु झाल्याचीही माहिती यूएई पोलिसांनी दिली आहे
नवी दिल्ली : पैशांच्या अफरातफर प्रकरणात पोलिसांच्या रडारवर असलेला निलंबित अधिकारी नितीश ठाकूर याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ठाकूरवर यूएईमध्ये कारवाई केल्याची माहिती काल अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ला यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.
नितीश ठाकूरच्या प्रत्यार्पणाची कारवाई सुरु झाल्याचीही माहिती यूएई पोलिसांनी दिली आहे. 21 जानेवारीला ही कारवाई झाली होती. नितीश ठाकूर रायगडचा उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होता.
ईडीच्या विनंतीनंतर इंटरपोलने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. 2011 आणि 2012 मध्ये दाखल केलेल्या एफआयआरनुसार मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
2016 मध्ये महाराष्ट्र एसीबीने नितीश ठाकूरला अटक केली होती. मात्र जामिनावर सुटल्यानंतर तो फरार झाला होता. गेल्या वर्षी नितीशचा भाऊ निलेश ठाकूरला ईडीने चौकशीसाठी अटक केली होती.
ठाकूरच्या पीआरएस एंटरप्रायझेसला शापूर्जी अँड पालनजी कंपनीने दिलेल्या 250 कोटींच्या अवैध ग्रॅटिफिकेशन्सबाबत आयकर विभाग चौकशी करत आहे का, असा प्रश्न शिव प्रताप शुक्लांना विचारण्यात आला होता. त्यावर, आयकर कायद्यातील तरतुदींनुसार करदात्यांची वैयक्तिक माहिती उघड करण्यास प्रतिबंध असल्याची माहिती शुक्लांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement