एक्स्प्लोर
पीएफचे पैसे आता मोबाईलद्वारे काढा, लवकरच 'उमंग' अॅप
नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्या नोकरदारांना कामगार मंत्रालयाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. उमंग या अॅपद्वारे पीएफचे पैसे काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यामुळे 4 कोटी सदस्यांना फायदा होईल, अशी माहिती कामगार मंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी दिली आहे.
काय आहे उमंग अॅप?
कामगार मंत्रालयाकडून उमंग अॅप लाँच केलं जाणार आहे. ज्याद्वारे पीएफचे पैसे काढता येतील. पीएफसंबंधीत कामं ऑनलाईन मार्गी लावण्यासाठी ईपीएफओ काम करत असल्याचं कामगार मंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी संसदेत एका लिखित प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
ईपीएफओच्या देशभरातील 123 कार्यालयांपैकी 100 कार्यालयांना सेंट्रल सर्व्हरशी जोडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
ऑनलाईन प्रणालीचा निर्णय का घेतला?
ईपीएफओला दररोज पीएफचे पैसे काढण्यासाठी, पेंशन संबंधीत किंवा पीडित कर्मचाऱ्यांसंबंधीत इंशुरन्स काढण्यासाठी जवळपास 1 कोटी अर्ज येतात. या सर्व अर्जांचं काम कागदोपत्री केलं जातं. त्यामुळे ऑनलाईन प्रणालीमुळे नोकरदारांची मोठी समस्या कमी होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement