एक्स्प्लोर
'जेएनयू'मध्ये मोदींच्या प्रतिमेसह रावणाच्या पुतळ्याचं दहन
नवी दिल्ली : दसऱ्याच्या मुहूर्तावर रावणाच्या पुतळ्याचं दहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचा वापर केल्यानं पुन्हा एकदा जेएनयू कॅम्पस वादात सापडलं आहे. या रावणदहनाचा व्हिडिओ समोर आला आहे.
दसऱ्याच्या संध्याकाळी एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी हे पुतळा दहन केल्याचा दावा केला जात आहे. मात्र या पुतळ्याचं दहन एनएसयूआयनेच केले आहे का? याची पुष्टी मात्र अद्याप झालेली नाही.
एनएसयूआयचे नेते सनी धीमान आणि अनिल मिणा यांनी हा व्हिडिओ फेसबुकवर टाकला आहे. त्यामुळे हे कृत्य एनएसयूआयचंच असावं अशी चर्चा आहे.
फक्त मोदीच नाही, तर रामदेवबाबा, अमित शाह यांच्यासह अनेक भाजप नेत्यांचे फोटो या पुतळ्यामध्ये वापरण्यात आले होते. शिवाय भाजपच्या या साऱ्या नेत्यांविरोधात घोषणाबाजीही सुरु होती. हे पुतळादहन नक्की कुणी केलं याची माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement