एक्स्प्लोर
Advertisement
उत्तर भारत भूकंपानं हादरलं; अफगाणिस्तानमध्ये 6.8 च्या तीव्रतेचा झटका
अफगानिस्तानच्या काबूल उत्तर पूर्वमध्ये भूकंपाचे केंद्र सांगण्यात येत आहे. हे जमिनीपासून 225 किलोमीटर खोलवर आहे. सायंकाळी पाच वाजून नऊ मिनिटांनी हा हादरा बसला.
नवी दिल्ली : भूकंपाच्या झटक्याने उत्तर भारत आज हादरला. काश्मीरमध्ये याची तीव्रता अधिक जाणवली. सायंकाळी पाच वाजून नऊ मिनिटांनी हा हादरा बसला. या भूकंपाचे केंद्रस्थान अफगानिस्तानमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. अफगाणिस्तानमध्ये याची तीव्रता 6.8 रिश्टर स्केल मोजण्यात आली आहे.
उत्तर भारतात याचे झटके सर्वसामान्यांनाही जाणवल्याचे पाहायला मिळाले. पंजाब, हरियाणा, काश्मीरमध्ये याची तीव्रता अधिक जाणवली. पाकिस्तानच्या इस्लामाबाद आणि अन्य शहरात देखील भूकंपाचे झटके जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. या भूकंपामुळे जवळपास दहा सेकंद जमीन कंप पावत होती. भूकंपाचे झटके जाणवू लागल्यानंतर भेदरलेल्या नागरिकांनी मोकळ्या जागेत धाव घेतली. दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची जाणीव होताच अनेकांनी ऑफिसच्या बाहेर धाव घेतली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
भूकंपादरम्यान अशी घ्या काळजी -
भूकंप जाणवल्यास मोकळया जागी जावे. भूकंपादरम्यान वाहनात थांबू नये. गॅस सिलिंडरचे रेग्युलेटर बंद करावे. बॅटरी, टॉर्च, प्रथोमोपचार पेटी जवळ बाळगावी. भूकंपादरम्यान फोटो फ्रेम व जड वस्तुंजवळ उभे राहू नये. जर तुम्ही इमारतीच्या बाहेर असाल तर, इमारत, झाड, खांब आणि विजेच्या तारांपासून दूर राहा. जर तुम्ही वाहनातून प्रवास करत असाल तर, तत्काळ वाहन थांबवून गाडीतच बसून राहा. तुम्ही ढिगाऱ्याखाली अडकला असाल तर कधीच माचिस पेटवू नका. हळूच आवाज द्या, जास्त हालचार करु नका. जेणेकरुन तुमच्यापर्यंत मदत लवकर पोहचेल.
संबंधित बातम्या :
भूकंपाच्या धक्क्याने तलासरी, डहाणूमधली गावे पुन्हा हादरली, नागरिकांचा जीव टांगणीला
पालघरमध्ये भूकंपाच्या धक्क्यांनंतर गरम पाण्याचे झरे?
Earthquake | जम्मू काश्मीर, चंदीगड आणि दिल्लीत भूकंपाचे धक्के, पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठा भूकंप | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement