एक्स्प्लोर
Advertisement
पालघरमध्ये भूकंपाच्या धक्क्यांनंतर गरम पाण्याचे झरे?
गेल्या काही दिवसांपासून पालघर आणि आजूबाजून परिसरात भूंकपाचे धक्के बसत आहेत. त्यामुळे जमिनीतून गरम पाणी आणि वाफा तर निघत आहे की काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
पालघर : पालघर जिल्ह्यातील वाडा येथील सोनारपाडा येथे जमिनीतून गरम वाफ तसेच गरम पाणी बाहेर येत असल्याच प्रकार समोर आला आहे. विद्युत खांब असलेल्या खड्ड्यात हे गरम पाणी आढळून आलं. त्यामुळे विद्युत खांबामुळे पाणी गरम होत असल्याचा अंदाज बांधला जात होता.
त्यानंतर वाडा तहसीलदार आणि विद्युत महावितरण यांनी सदर ठिकाणी पाहणी केली. विद्युत प्रवाह बंद केल्यानंतरही गरम पाणी आणि वाफा कायम होत्या, त्यामुळे भूगर्भातील हालचालींमुळे हे गरम पाणी बाहेर आल्याचा अंदाज प्रथमदर्शनी समोर आला.
गेल्या काही दिवसांपासून पालघर आणि आजूबाजून परिसरात भूंकपाचे धक्के बसत आहेत. त्यामुळे जमिनीतून गरम पाणी आणि वाफा तर निघत आहे की काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. भू-गर्भ शास्त्रज्ञांची मदत घेऊन लवकरच या बाबतची नेमकी माहिती समोर येईल, अशी माहिती वाडा येथील तहसीलदार यांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement