एक्स्प्लोर

लस घेतल्यानंतर सोशल मीडियावर सर्टिफिकेटचा फोटो पोस्ट करणे पडू शकते महागात

कोविड 19 लसीकरण प्रमाणपत्र सोशल मीडियावर शेअर करण्याच्या विरोधात भारत सरकारने वापरकर्त्यांना इशारा दिला आहे.लस प्रमाणपत्रात नाव, वय आणि लिंग यासारखी वैयक्तिक माहिती असते आणि फसवणूक करणारे त्याचा गैरवापर करू शकतात.

कोरोना महामारीत कोविड प्रतिबंधक लसीचा डोस संजीवनीपेक्षा कमी नाही. प्रत्येकाने ही घेणे आवश्यक आहे. लस टोचल्यानंतर याचे प्रमाणपत्र दिले जाते जेणेकरुन डोस घेतल्याची माहिती आपल्याकडे राहाते. अनेकजण हे प्रमाणपत्र सोशल मीडियावर शेअर करताना पाहायला मिळत आहे. मात्र, असे करणे आपल्याला महागात पडू शकते. बऱ्याच लोकांना सोशल मीडिया जसे की ट्विटर, फेसबुक किंवा इतर साइट्सवर आपली वैयक्तिक माहिती शेअर करण्याची सवय आहे. मात्र, याचा सायबर क्रिमिनल्स फायदा घेत आहेत.

महाराष्ट्र सायबर सेलचे एसपी संजय शिंत्रे म्हणाले की, आपला तपशील अशा प्रकारे शेअर करणे धोकादायक आहे. शिंत्रे म्हणाले की, लस घेतल्यानंतर तुम्हाला मिळालेल्या प्रमाणपत्रावर तुमची वैयक्तिक माहिती असते. ही माहिती सायबर क्रिमिनल डार्क नेटवर विकू शकतात किंवा दुसर्‍या एखाद्याला एडिट करुन विकू शकता.

हे प्रमाणपत्र वापरुन आपण एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी प्रवास करू शकता, आंतरराष्ट्रीय प्रवास करू शकता. बऱ्याच कंपन्या अशा आहेत, ज्या लोकांना नोकरीसाठी येताना लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र मागते. अशा परिस्थितीत हे सायबर गुन्हेगार आपली माहिती एडीट करून ती अशा लोकांना विकू शकतात.

काही दिवसांपूर्वी एका गुन्ह्यामध्ये आरोपीने सिप्ला कंपनीच्या नावाचा वापर करुन औषधांची विक्री करत लोकांची फसवणूक केली. तपासादरम्यान माहिती मिळाली, आरोपी लोकांशी संपर्क साधण्यासाठी 40 बनावट बँक खाती आणि 40 बनावट सिमकार्ड वापरत होता.

शिंत्रे म्हणाले की, आपल्या प्रमाणपत्रातील माहितीचा वापर करून, सायबर-क्रिमिनल्स बनावट कागदपत्रे देखील तयार करू शकतात, ज्याचा उपयोग बँक खाती उघडण्यासाठी आणि सिम कार्ड खरेदी करण्यासाठी केला जाऊ शकतो.

याच विषयावर लोकांना सतर्क करण्यासाठी सायबर पोलिसांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सायबर एक्पर्ट अंकुर पुराणिक यांनी सांगितले की लस प्रमाणपत्र चुकीच्या हातात पडल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो.

पुराणिक म्हणाले की बर्‍याचवेळा पहिला डोस मिळाल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते, ज्यावर दुसरा डोस कधी मिळणार याची माहिती असते. जर हे प्रमाणपत्र सायबर फ्रॉडच्या हाती लागले तर तुम्हाला कॉल करुन फसवणूक करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

जर आपल्याला पोस्ट करण्याची खूप इच्छा असेल तर आपण ते ब्लर करून पोस्ट केले पाहिजे. जेणेकरून कोणीही त्याचा तपशील वाचू शकणार नाही आणि जर ते वाचू शकले नाही तर त्याचा गैरवापरही होणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget