एक्स्प्लोर
Advertisement
दिल्लीत खळबळ, चकमकीनंतर एका दहशतवाद्याला अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ISIS च्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. त्याच्याकडून दोन प्रेशर कूकर, आयईडीसह काही हत्यारं आणि काही महत्वाची कागदपत्रं जप्त केली आहेत.
नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ISIS च्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. त्याच्याकडून दोन प्रेशर कूकर, आयईडीसह काही हत्यारं आणि काही महत्वाची कागदपत्रं जप्त केली आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे पोलिस उपायुक्त (DCP) प्रमोद सिंह कुशवाहा यांनी सांगितलं की, काल रात्री धौला कुआं परिसरात झालेल्या चकमकीत IED सह एका ISIS दहशतवाद्याला अटक केली आहे.
अटक करण्यापूर्वी रात्री11.12 वाजता दिल्लीच्या पोलिस आर्मा स्कूलजवळ पोलीस आणि अतिरेक्यामध्ये चकमक उडाली. पोलिसांनी धडक कारवाई करत अतिरेक्याला बेड्या ठोकल्या. या दहशतवाद्याचं नाव मोहम्मद युसुफ असं आहे. त्याच्याजवळून आयईडी स्फोटकांसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळावरून दोन अतिरेकी फरार झाले असल्याची माहिती आहे.
राजधानी दिल्लीत आधीपासून अलर्ट जारी केलेला आहे. गुप्तचर एजेंसीला तीन दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती मिळाली होती. हे दहशतवादी कोणत्यातरी व्हिआयपीला निशाणा बनवणार होते आणि मोठा बॉम्बस्फोट करणार होते. त्या व्हिआयपी व्यक्तीचं नाव अजून समोर आलेलं नाही. दिल्ली पोलिस आता पकडलेल्या दहशतवाद्याची चौकशी करत आहेत. दिल्लीत छापामारी सुरु दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे की, जर फरार झालेल्या दहशतवाद्याला पकडलं गेलं नाही तर भविष्यात धोक्याची घंटा आहे. यामुळं दिल्ली पोलिसांच्या सहा टीम त्यांच्या शोधात आहेत. या टीमने वेगवेगळ्या ठिकाणी रेड टाकायला सुरुवात केली आहे.One ISIS operative arrested with Improvised Explosive Devices (IEDs) by our Special Cell after an exchange of fire at Dhaula Kuan: Pramod Singh Kushwaha, Delhi Deputy Commissioner of Police (DCP), Delhi Police Special Cell pic.twitter.com/nIJrR03iUA
— ANI (@ANI) August 22, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement