एक्स्प्लोर

धक्कादायक! दिल्लीतील सरकारी रुग्णालयात बनावट स्टेंटमुळे 265 रुग्ण दगावले

Fake Stent : भाजप नेता आदेश गुप्ता यांनी दिल्लीतील केजरीवाल सरकारवर हल्लाबोल करत सांगितलं आहे की, '265 रुग्णांच्या मृत्यूला दोषींनी संरक्षण देणाऱ्या केजरीवालांनी राजीनामा द्यावा.'

Delhi BJP Chief Adesh Gupta Attack On Kejriwal Government : देशाची राजधानी दिल्लीत एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. दिल्लीतील राजीव गांधी रुग्णालयात 265 हदय रुग्णांचा चुकीचे आणि बनावट स्टेंट बसवल्यामुळे मृत्यू झाल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. यानंतर दिल्लीचे भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता केजरीवाल सरकारला धारेवर धरलं आहे. आदेश गुप्ता यांनी केजरीवाल सरकारच्या रुग्णालयांबाबतच्या सर्वोत्तम सुविधांच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आदेश गुप्ता यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद (Arvind Kejriwal) केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत म्हटलं आहे की, '265 लोकांच्या मृत्यूच्या दोषींना संरक्षण देणाऱ्या केजरीवालांनी राजीनामा द्यावा.' आदेश गुप्ता पुढे म्हणाले, 'कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत दिल्लीतील जीटीबी (GTB) रुग्णालयात दाखल झालेल्या 3793 रुग्णांपैकी 1545 रुग्णांचा मृत्यू झाला. या मृत्यूंवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गप्प का आहेत? कोणाला वाचवण्यासाठी दिल्ली सरकार चौकशी समितीचा अहवाल सार्वजनिक करत नाही, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

आरटीआय माहिती अधिकारानूत बाब समोर आल्यानंतर आदेश गुप्ता यांनी गुजरातमध्ये आपचा प्रचार करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री  अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'दिल्लीचे मुख्यमंत्री गुजरातमध्ये गुजरातमधील शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेच्या पोकळ मॉडेलचा गौरव करत आहेत.' ते पुढे म्हणाले, 'केजरीवाल अधिकारी, न्यायाधीश, राजकारणी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्यांच्या मुलांची यादी सार्वजनिक का करत नाहीत? दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुजरातमध्ये जाऊन त्यांच्या 'वर्ल्ड क्लास' आरोग्य व्यवस्थेबद्दल मोठमोठे दावे करत आहेत, मात्र त्यांचं सत्य आता सर्वांसमोर आलं आहे.

'केजरीवालांच्या मित्राच्या नातेवाईकांकडून स्टेंटचा पुरवठा'
आदेश गुप्ता यांनी सांगितलं की, 'राजीव गांधी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये चुकीचे आणि बनावट स्टेंट बसवल्यामुळे एकूण 265 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरटीआयच्या माहिती अधिकारातून समोर आलं आहे. दिल्लीच्या सरकारी रुग्णालयांमध्ये स्टेंटचा पुरवठा करणारे व्यक्ती केजरीवाल यांचे अत्यंत जवळचे मित्र सत्येंद्र जैन यांचे नातेवाईक असल्याचे सांगितलं जातं आहे. हेच बनावट स्टेंट निष्पाप रुग्णांच्या मृत्यूचं कारण आहेत. या निष्काळजीपणाला आणि फसवेगिरीला आश्रय देणाऱ्या मुख्यमंत्री केजरीवाल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे

स्थापन केलेल्या समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही
आदेश गुप्ता म्हणाले की, आपला निष्काळजीपणा लपवण्यासाठी केजरीवाल यांनी 10 मार्च 2022 रोजी चौकशी समिती स्थापन केली, परंतु आजपर्यंत जनता त्या समितीच्या अहवालाची वाट पाहत आहे. तपासानंतर काय निष्पन्न झाले, या रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार कोण, दोषींवर कारवाई झाली का, या सर्व प्रश्नांना सरकार दडपण्याचा प्रयत्न करत आहे. अखेर समितीचा अहवाल कधी सार्वजनिक होणार आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागाचे हे सत्य गुजरातसह संपूर्ण देशाला कळलं आहे, पण केजरीवाल आपल्या विकासाच्या पोकळ मॉडेलचा गौरव करताना थकत नाहीत.

स्टेंट म्हणजे काय?
एखाद्या व्यक्तीच्या छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते. यावेळी अनेकदा रुग्णांना अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, स्टेंट, बायपास अशा उपचारांबाबत सांगितलं जातं. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्त वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास डॉक्टरांकडून स्टेंट बसवण्याचा किंवा बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिला जातो. स्टेंट म्हणजे स्प्रिंगप्रमाणे प्रसरण पावणारी बारीक नळी असते. काही वेळा कोलेस्टेरॉल किंवा इतर कारणांमुळे हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे येतात. स्टेंट रक्तवाहिन्यांना आधार देत रक्तवाहिन्यांना रक्त वाहून नेण्यास पोकळी निर्माण करण्याचे काम करतो. हा स्टेंट सुमारे दोन ते चार सेंटिमीटपर्यंत असतो. रक्तवाहिन्यांच्या आकारानुसार किती सेंटिमीटरचा स्टेंट लावावा हे ठरवले जाते.

महत्त्वाच्या इतर बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
Horoscope Today 08 July 2024 : आज आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ratnagiri Rain Jagbudi River : जगबुडी नदीचं पाणी इशारा पातळीच्या वरMumbai Air Way : दृष्यमानता कमी झाल्यामुळे हवाई वाहतुकीवरही परिणामABP Majha Headlines 08AM एबीपी माझा हेडलाईन्स  8 AM 08 July 2024 Marathi NewsMumbai Hindmata Junction : मुंबईत हिंदमाता जंक्शनवर पाणी साचलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
Horoscope Today 08 July 2024 : आज आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Embed widget