Amazon : अॅमेझॉनवर गर्भपाताच्या औषधांची विक्री, अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई
Case Against Amazon : अॅमेझॉनवर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपात करण्यासाठी औषधांची विक्री करण्यात येत असल्याची बाब उघडकीस आली आहे. याविरोजात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Abortion Pills : अॅमेझॉनविरोधात मुंबईच्या वांद्रेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताच्या औषधांची ऑनलाईन विक्री केल्याचं उघड झाल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची (FDA) कारवाई केली आहे. गर्भपात करण्यासाठी औषधांची विक्री करण्यासाठी डॉक्टरांची चिठ्ठी गरजेची असते. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताच्या औषधांची विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र अॅमेझॉनवर गर्भपाताच्या औषधांची ऑनलाईव सर्रास विक्री होत असल्याचं आढळल्याने अन्न आणि प्रशासनाने कारवाईचा बडगा उभारला आहे. अॅमेझॉनविरोधात वांद्रे येथील खेरवाडी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गर्भपात करण्यासाठीची औषधांची ऑनलाईन पोर्टलवर विना डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय म्हणजेच प्रीस्क्रिपशनशिवाय सर्रास विक्री होत असल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाच्या निरीक्षणात आलं. यानंतर या प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने अॅमेझॉनवर गर्भपात करण्यासाठीची औषधे ऑनलाईन मागवली. यानंतर ही औषधे कुरिअरद्वारे उपलब्ध झाली. यानंतर अन्न आणि प्रशासनाने अॅमेझॉन विरोधात गुन्ह्याची नोंद केली. गर्भपात करण्यासाठीची औषधांची (MTP Kit) विकण्यासाठी विक्रेत्यांना त्याचे प्लॅटफॉर्म वापरण्याची जाहिरात आणि परवानगी देण्यासाठी औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत अॅमेझॉनविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
'ए केअर'( A care) या ब्रँडच्या नावाच्या कंपनीकडून अॅमेझॉन गर्भपात करण्यासाठीची औषधाची म्हणजेच एमटीपी किटची (MTP Kit) विक्री सुरु होती. गुप्तचर अधिकार्यांनी कोणत्याही नोंदणीकृत डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन न देता ग्राहक असल्याचे भासवत या एमटीपी किटची ऑर्डर दिली. विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ई-कॉमर्स पोर्टल अॅमेझॉनवर एमटीपी किट विक्रीचा केल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई सुरू केली.
एफडीएने दावा केला आहे की, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायदा 2002 आणि नियम 2003 नुसार, एमटीपी किट कोणत्याही नियुक्त आरोग्य सुविधेवर किंवा नोंदणीकृत व्यक्तीच्या देखरेखीबाहेर न घेतल्यास ग्राहकाच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी धोकादायक ठरू शकते. औषधांचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्यामुळे विना प्रीस्क्रिपशन शिवाय विक्री करण्यास मनाई आहे.
गुप्तचर शाखेचे सहाय्यक आयुक्त गणेश रोकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन पोर्टलवर अनेक नियमांचे उल्लंघन करून औषधांचा पुरवठा केला जात आहे. केंद्र सरकार आणि नियुक्त प्राधिकरणांनी औषधे आणि औषधांच्या ऑनलाईन विक्रीसाठी कोणतेही नियम निश्चित करण्यात आलेले नाहीत'
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Char Dham Yatra 2022 : आजपासून चारधाम यात्रा सुरू, गंगोत्री-यमुनोत्रीचे दरवाजे उघडणार, कोविड अहवालाची गरज नाही
- Viral Video : उंच आकाशात अनोखा स्टंट, तब्बल सहा हजार फुट दोरीवर चालत पठ्ठ्यानं केली कमाल
- Coronavirus Cases Today : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, मृत्यूही घटले, गेल्या 24 तासांत 2568 नवे रुग्ण