High Court : मोबाईलचा रिचार्ज अन् करवा चौथचा उपवास, नवऱ्याने घटस्फोटाच मागितला, कोर्टानेही मान्य केला पण...
High Court : याचिकेत म्हटले आहे की या जोडप्याचे 2009 मध्ये लग्न झाले आणि पत्नीने 2011 मध्ये आपल्या मुलीच्या जन्माच्या काही दिवस आधी घर सोडले.
मुंबई : करवा चौथचे ( Karva Chauth) व्रत न केल्याने नवऱ्याने कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली. दरम्यान नवऱ्याची ही याचिका कोर्टाने मान्य देखील केली. करवा चौथचे व्रत न केल्याने नवऱ्याने बायकोचा हा क्रूरपणा असल्याचं म्हटलं. त्याचवेळी न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, करवा चौथचा उपवास करणे किंवा न करणे हा वैयक्तिक निर्णयाचा विषय आहे. व्रत न करणे हा कोणत्याही प्रकारचा क्रूरपणा नाही आणि या आधारावर लग्न मोडलं जाऊ शकत नाही. तरीही न्यायालयाने नवऱ्याची घटस्फोटाची याचिका का मान्य केली यासंदर्भात सविस्तर जाणून घेऊयात.
कोर्टाचे म्हणणे आहे की, बायकोने नवऱ्यासाठी उपवास ठेवला नाही आणि नवऱ्याने याचिकेत सांगितल्या प्रमाणे संबंधित गोष्टींवरून असे दिसते की पत्नीला या लग्नात राहायचे नाही. ज्याप्रमाणे ती वागली आहे, यामुळे तिच्या नवऱ्याच्या देखील भावना दुखावल्या असतील. बायकोने करवा चौथचा उपवास ठेवला नाही म्हणून नवऱ्याने ट्रायल कोर्टात याचिका दाखल केली. दरम्यान ट्रायल कोर्टात त्यांचा घटस्फोट मान्य देखील झाला.
क्रूरतेच्या आरोपांविरोधात पत्नीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. बार आणि बँचच्या अहवालानुसार, 22 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने सांगितले की, 'उपवास करणं ही निवडीची बाब आहे. विविध धार्मिक श्रद्धा बाळगणे आणि काही धार्मिक कर्तव्ये न करणे याला क्रूरता म्हणता येणार नाही. रीतिरिवाजांमध्ये राहून एका महिलेने उपवास करण्यास नकार दिल्याने पत्नीला नवऱ्याचा आदर नसल्याचे दिसून येते. मात्र, न्यायालयाने ट्रायल कोर्टाचा घटस्फोटाचा निर्णय कायम ठेवला आहे.
याचिकेमध्ये नवऱ्याने काय म्हटलं?
नवराने मोबाईल रिचार्ज न केल्यामुळे पत्नीने उपवास ठेवला नाही, असे नवराचे म्हणणे आहे. नवराने असेही सांगितले की, पत्नी छोट्या-छोट्या गोष्टींवर रागावायची आणि सासरच्यांशी भांडणही करायची. नवराने सांगितले की 2009 मध्ये त्यांचे लग्न झाले आणि पत्नी 2011 मध्ये घर सोडून गेली. त्यावेळी त्यांची मुलगीही जन्माला येणार होती.एप्रिल 2011 मध्ये त्याला स्लिप डिस्क झाली होती. यावेळी पत्नीने नवराची काळजी न घेता सिंदूर काढून, मंगळसूत्र काढून पांढरे कपडे घातले. पत्नीने स्वतःला विधवा घोषित केले. त्यानंतरच नवराने घटस्फोटाची याचिका दाखल केली.
कोर्टाने काय म्हटलं?
यावर दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले की, करवा चौथचा उपवास न करणे हे घटस्फोटाचे कारण असू शकत नाही, परंतु खटल्यातील उर्वरित तथ्ये लक्षात ठेवल्यास ट्रायल कोर्टाचा निर्णय योग्य आहे. नवरा जिवंत असताना आणि तो आजारी असताना आपल्या बायकोला विधवा म्हणून पाहणं नवराला वाईट वाटलं असणार, असं न्यायालयाने म्हटलं. न्यायालयाने हे मान्य केले की पत्नीने 1 वर्ष 3 महिन्यांत सासरचे घर सोडले आणि त्यानंतर जुळवण्याचा प्रयत्नही केला नाही. म्हणून हिंदू विवाह कायदा 1955 च्या कलम 13 च्या पोटकलम 1(ia) अंतर्गत घटस्फोटाचा ट्रायल कोर्टाचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं.
हेही वाचा :
Mediclaim : मेडिक्लेमच्या 'या' नियमात सरकार बदल करणार? ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा