एक्स्प्लोर

टॅटू असल्यास वायूसेनेत नोकरी नाहीच, हायकोर्टाचं फर्मान

वायूसेनेच्या जाहिरातीत याबाबत स्पष्ट निर्देश दिल्याचं कोर्टाने नमूद केलं. कोर्टात अर्ज करताना संबंधित उमेदवाराने टॅटूचा फोटोही जमा केला नसल्याचं कोर्टाने सांगितलं.

नवी दिल्ली : शरीरावर टॅटू काढणाऱ्या व्यक्तींना भारतीय वायूसेनेत भरती होण्याचं स्वप्न पूर्ण करता येणार नाही. खांद्यावर पर्मनंट टॅटू काढल्यामुळे वायूसेना अधिकाऱ्याची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय दिल्ली हायकोर्टाने कायम ठेवला आहे. वायूसेनेत भरती होणाऱ्या व्यक्तींना विशिष्ट टॅटू काढण्याची मुभा आहे. आदिवासी बांधवांच्या रीतीभाती किंवा परंपरेत बसणाऱ्या टॅटूंनाच वायूसेनेत परवानगी आहे. मात्र संबंधित उमेदवाराने गोंदवलेला टॅटू या निकषात बसत नसल्याचं जस्टिस हिमा कोहली आणि जस्टिस रेखा पाटील यांनी सांगितलं. वायूसेनेच्या जाहिरातीत याबाबत स्पष्ट निर्देश दिल्याचं कोर्टाने नमूद केलं. कोर्टात अर्ज करताना संबंधित उमेदवाराने टॅटूचा फोटोही जमा केला नसल्याचं कोर्टाने सांगितलं. खांद्याचा आतील भाग, हाताच्या पंज्याचा मागील किंवा पुढील भाग यावरच पर्मनंट टॅटूची परवानगी असल्याचं वायूसेनेच्या वकिलांनी स्पष्ट केलं. याशिवाय, आदिवासी बांधवांच्या रीतीभाती किंवा परंपरेत बसणाऱ्या टॅटूंनाच वायूसेनेत परवानगी आहे. उमेदवाराला भरती करण्याच्या निर्णयाचा अधिकार निवड समितीकडे असल्याचंही वकिलांनी सांगितलं. एअरमन पदावरील नियुक्ती रद्द करण्याच्या वायूसेनेच्या निर्णयाला याचिकाकर्त्याने आवाहन दिलं होतं. नियुक्तीपत्र जारी केल्यानंतर प्रमाणपत्रं देताना आपल्या शरीरावर टॅटू असल्याची माहिती आपण अधिकाऱ्यांना दिली होती, आपण लपवाछपवी केलेली नाही, असा दावा याचिकाकर्त्याने केला. वायूसेनेच्या जाहिरातीत याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले होते, त्यानुसार याचिकाकर्त्याच्या शरीरावरील टॅटू त्या निकषात बसत नाही. त्यामुळे त्याची नियुक्ती रद्द करण्याच्या आदेशात कोणतीही गफलत नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget