दिल्ली सरकार बनवणार उन्हाळी कृती आराखडा, प्रदूषण कमी करण्यासाठी तयार करणार योजना
दिल्ली सरकार (Delhi Government) उन्हाळी कृती आराखडा बनवणार आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Delhi Government : दिल्ली सरकार लवकरच उन्हाळी कृती आराखडा बनवणार. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी याबाबत माहिती दिली आहे. दिल्ली सरकारमधील पर्यावरण विभाग, महापालिका, पीडब्ल्यूडी आणि डीडीए यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पर्यावरणमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. "ऑक्टोबरपासून प्रदूषणाची पातळी वाढत असते. त्यावेळी हिवाळी कृती आराखडा तयार करण्यात आला होता. यावेळी उन्हाळ्यातील कृती आराखड्यावरही काम करणार असल्याचे राय यांनी सांगितले.
गोपाल राय म्हणाले, "आम आदमी पार्टीचे सरकार स्थापन झाल्यानंतर दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी सातत्याने काम केले जात आहे. या उपाययोजनांमुळे प्रदूषणात घट झाली आहे. CSE आणि TERI ने प्रदूषणाच्या पातळीचा अभ्यास केला आहे. दिल्लीतील 31 टक्के हवा प्रदूषण हे दिल्लीतूनच होते. परंतु, उर्वरित 69 टक्के प्रदुषण बाहेरून होत आहे."
मंत्री राय यांनी आकडेवारीच्या माध्यमातून पर्यावरण सुधारण्याचा दावा केला. ते म्हणाले, "सरकार करत असलेल्या कामांमुळे 2018 मध्ये 53 टक्के हवा प्रदुषणात सुधारणा झाली होती. त्यामध्ये वाढ होऊन आता 72 टक्के चांगली हाव आहे. हवेच्या गुणवत्तेत वाढ होत असल्याचे दिसत आहे."
"11 एप्रिल रोजी पुन्ह मंत्री राय यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत उन्हाळी कृती आराखडा जाहीर केला जाईल आणि पर्यावरणाला चांगल्या दिशेने नेण्यासाठी 14 मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल. यामध्ये उघड्यावर कचरा जाळणे, रस्त्यालगतचा हरित पट्टा तयार करणे, तलावांचे पुनरुज्जीवन, नागरी शेती, हरित उद्यानांचा विकास, वृक्षारोपण आदी घटकांवर लक्ष दिले जाणार आहे, अशी माहिती मंत्री राय यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
Temperature Rise : मार्च महिना ठरला सर्वात उष्ण महिना, 122 वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद
पंतप्रधान मोदींची इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्याशी चर्चा, 'या' मुद्यांवर साधला संवाद
...तर आपलीही अवस्था श्रीलंकेसारखी होईल, पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चिंता व्यक्त
महागाईवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा, वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांवर 1.25 लाख कोटींचा बोजा पडणार; सुरजेवालांचा दावा