एक्स्प्लोर
कन्हैयाकुमार विरोधात देशद्रोहाचा खटला चालणार, दिल्ली सरकारकडून खटला चालवण्यासाठी परवानगी
संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरुला फाशीची शिक्षा दिली. त्याचा निषेध म्हणून त्या दिवशी जेएनयूत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याचा आरोप कन्हैया कुमारवर आहे.
नवी दिल्ली : जेएनयू छात्र संघाचे माजी अध्यक्ष आणि सीपीआय नेता कन्हैया कुमार विरोधात आता देशद्रोहाचा खटला चालणार आहे. 2016 मध्ये दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात कथित देशविरोधी नारे दिल्याप्रकरणी हा खटला कन्हैय्या कुमार विरोधात चालणार आहे. कन्हैया कुमारविरोधात खटला चालवण्यासाठी दिल्ली सरकारने परवानगी दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली निवडणुकीच्या प्रचारात जेएनयू, नागरिकत्व कायद्याच्या वादापासून दूर राहिले होते. त्यांनी आपल्या पहिल्या टर्ममध्ये कन्हैय्या विरोधात खटला चालवण्याबाबत निर्णय घेतला नाही, मात्र दुसऱ्यांदा सत्तेत आल्यावर परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे कन्हैया कुमारच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.
"या प्रकरणात कन्हैया कुमार सोबत अन्य दोघांच्या विरोधात खटला चालणार आहे. दिल्ली सरकारने देशद्रोहाच्या प्रकरणात या तिघांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी परवानगी दिली आहे," अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
#JNU Attack जेएनयूमध्ये शांतपणे कन्हैय्या कुमारचं भाषण आणि आझादीच्या घोषणा ऐकत होती दीपिका पादुकोण
विशेष म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजपने आम आदमी पक्षावर कन्हैया कुमारला वाचवत असल्याचा आरोप केला होता. या मुद्द्यावरुन भाजपने आपला घेरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी आपने या आरोपाला उत्तर देणं देखील टाळलं होतं. दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात कथित देशविरोधी नारे दिल्याप्रकरणी हा खटला कन्हैय्या कुमार विरोधात चालणार आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला यासंबंधीची संमती देणारी फाईल ही गेल्या काही दिवसांपासून पडून होती. मात्र केजरीवाल सरकारने आता यावर निर्णय घेतला आहे. यामुळे आता कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा खटला चालणार आहे. काय आहे प्रकरण? 9 फेब्रुवारी 2016 रोजी जेएनयूच्या कॅम्पसमध्ये घोषणाबाजी केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. व्हिडीओ समोर आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी कन्हैय्याकुमारच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला गेला होता. जेएनयू कथित देशविरोधी घोषणा प्रकरणी तीन वर्षानंतर कन्हैय्याकुमार आणि उमर खालिदसह 10 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचं कलम लावण्यात आलं आहे. तब्बल 1250 पानांचं आरोपपत्र तयार करण्यात आलं आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement