एक्स्प्लोर

Delhi Exit Poll | दिल्लीत 'फिर एक बार, केजरीवाल सरकार', आप हॅटट्रिक साधणार, एक्झिट पोलचा अंदाज

दिल्ली विधानसभेसाठी मतदान पूर्ण झालं आहे. आता दिल्लीकरांचा मूड काय सांगतो. 'अबकी बार मोदी सरकार' की 'केजरीवाल बरकरार' हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. त्याच अनुषंगानं एबीपी माझा आणि सी व्होटरचा सर्व्हे या सगळ्याचे अंदाज आपल्याला देणार आहे. कोण होणार दिल्लीचा कारभारी, चालणार का मोदींचा करिश्मा, काँग्रेसचे काय हालहवाल.

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये पुन्हा एकदा केजरीवाल यांचेच सरकार येणार असून अरविंद केजरीवाल हे हॅटट्रिक साधणार असल्याचा अंदाज एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. भाजपने केलेला जोरदार प्रचार आणि टीकांच्या आक्रमणासमोर आम आदमी पार्टीकडेच दिल्लीचा गड राहणार असल्याचा अंदाज आहे. दिल्लीमध्ये 2020 च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 70 जागांपैकी आम आदमी पक्षाला 51 ते 65 जागा मिळण्याचा अंदाज आहे. या आकड्यानुसार पुन्हा एकदा केजरीवाल यांची एकहाती सत्ता दिल्लीत येण्याची चिन्हे आहेत. भाजपला यावेळी 5 ते 19 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 0 ते चार जागा मिळण्याचा अंदाज आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे अरविंद केजरीवाल यांना शह देण्यासाठी भाजपने उभे केलेल्या मनोज तिवारी यांची जागा देखील धोक्यात असल्याचे या सर्व्हेत सांगण्यात आले आहे. Delhi Opinion Poll | दिल्लीकरांचा विश्वास केजरीवालांवरच, पुन्हा सत्ता 'आप'च्या हाती, सर्वेचा अंदाज कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार  आम आदमी पक्ष -  51 ते 65 जागा भाजप - 3 ते 17 जागा काँग्रेस -0 ते 3 जागा कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान  आप - 50.4 भाजप - 36 काँग्रेस - 9 इतर - 2.6 दिल्ली विधानसभेसाठी मतदान झालं. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57 टक्क्यांपर्यंत मतदानाची टक्केवारी होती. संध्याकाळच्या टप्प्यातले आकडे अजून यायचे आहेत. दिल्लीतल्या इतर भागात कमी, मध्यम असा प्रतिसाद मिळत असताना शाहीन बाग परिसरात मात्र नागरिकांनी मतदानाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. सकाळपासूनच इथं मतदानासाठी गर्दी होती. आता हे सगळे मतदानाचे पॅटर्न पाहताना याचा फायदा कोणाला होणार, फटका कोणाला बसणार, दिल्लीकरांचा मूड काय सांगतो. त्याच अनुषंगानं एबीपी माझा आणि सी व्होटरचा सर्व्हे या सगळ्याचे अंदाज आपल्याला देणार आहे. दिल्लीतलं मतदान संपल्यानंतर आता दिल्लीचा मूड सांगणारा हा सर्वात मोठा एक्झिट पोल आहे. Delhi Election 2020 Opinion Poll : मुख्यमंत्रीपदी पुन्हा केजरीवाल यांनाच पसंती 2015 च्या निवडणुकीत काय होती स्थिती 2015 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने 70 जागांपैकी 67 जागांवर दणदणीत विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी भाजपला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसला खातं देखील उघडता आलेलं नव्हतं. माझा विशेष | 'गाली और गोली'नं दिल्ली जिंकता येईल? मुस्लीमांचे कैवारी पंतप्रधान मोदी गप्प का?   
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati Shivaji Maharaj Statue :जपानच्या टोकियोत बसवणार शिवरायांचा पुतळा, देशभरात रथयात्रा सुरूPune Eknath Shinde : पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटेल : एकनाथ शिंदेAshok Dhodi Kidnap Case Palghar : मोठी बातमी! अशोक धोडींचा मृतदेह गाडीच्या डिक्कीमध्ये सापडलाMahakumbh:ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी त्रिपाठीचे महामंडलेश्वर पद काढले, किन्नर आखाड्याकडून मोठी कारवाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Embed widget