(Source: ECI/ABP News/ABP Majha)
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह दोन दिवसांच्या लडाख-श्रीनगर दौऱ्यावर; सुरक्षेचा घेणार आढावा
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लडाखमधील एलएसी आणि काश्मीरमधील एलओसीवरील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. आज सकाळी राजनाथ सिंह लेह विमानतळावर पोहोचले. तेथून ते लडाखमध्ये दाखल झाले आहेत.
नवी दिल्ली : भारत-चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज लेह आणि श्रीनगरच्या दौऱ्यासाठी दोन दिवसीय दौऱ्यासाठी लडाखला पोहचले आहेत. यादरम्यान, राजनाथ सिंह या दरम्यान ते लडाख व जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यांच्यासोबत संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत बिपीन रावत आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे हे देखील आहेत.
राजनाथ सिंह यांनी ट्वीट करून दिली माहिती
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीट करत त्यांच्या दोन दिवसीय लडाख आणि श्रीनगरच्या दौऱ्यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी ट्वीट केलं की, 'मी दोन दिवसांच्या लडाख आणि जम्मू-काश्मीर दौऱ्यासाठी रवाना होत आहे. मी सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व त्या क्षेत्रात तैनात असलेल्या जवानांशी संवाद साधण्यासाठी दौरा करत आहे.'
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लडाखमधील एलएसी आणि काश्मीरमधील एलओसीवरील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. आज सकाळी राजनाथ सिंह लेह विमानतळावर पोहोचले. तेथून ते लडाखमध्ये दाखल झाले आहेत.
फॉरवर्ड पोस्टचा दौरा केल्यानंतर सीमेवरील जवानांना भेटणार राजनाथ सिहं
लेह येथे असलेल्या 14 कोरचे कमांडर, लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह यांची भेट घेणार असून चीनसोबत सुरु असलेल्या डिसएंगेजमेंट प्रक्रियेबाबतही माहिती घेणार आहेत. कोअर कमांडर त्यांना चीन लगतची सीमा म्हणजेच, एलएसीवर भारतीय सैन्याच्या तयारीबाबतही माहिती देणार आहेत. आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर संरक्षणमंत्री फॉरवर्ड पोस्टचा दौरा केल्यानंतर जवानांना भेटून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
आज (शुक्रवार) लडाखचा दौरा केल्यानंतर उद्या (शनिवारी) संरक्षणमंत्री श्रीनगरचा दौरा करणार आहेत. काउंटर-टेरेरिज्म ऑपरेशन्ससोबतच पाकिस्तानलगतच्या एलओसीच्या सुरक्षेचीही पाहणी राजनाथ सिंह करणार आहेत.
दरम्यान, संरक्षणमंत्री 3 जुलै रोजी लेह-लडाखच्या दौऱ्यावर रवाना होणार होते. परंतु, काही कारणांमुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता. त्यावेळी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जुलै रोजी एक दिवसीय लेह-लडाखच्या दौऱ्यावर पोहोचले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अचानक लेह-लडाख दौरा
भारत आणि चीन सीमेवर तणाव सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं सरप्राईज दिलं होतं. सूर्योदय होण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अचानक लेहमध्ये पोहोचले. भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी पंतप्रधान लेह लडाखमध्ये दाखल झाले होते. विशेष म्हणजे मोदींच्या या दौऱ्याची अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. मोदींचा हा दौरा चीनला एकप्रकारे संदेशही होता की, "देश आपल्या सैन्याच्या पाठिशी ठामपणे उभा आहे." पंतप्रधान मोदींसोबत चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत आणि लष्करप्रमुख एम एम नरवणे हे देखील उपस्थित होते.
भारत-चीन हिंसक झटापटीत भारताचे 20 जवान शहीद
लडाख सीमेवर तणाव सुरु असतानाच 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली. यामध्ये भारताच्या कमांडिंग ऑफिसरसह 20 जवान शहीद झाले होते. तर काही जवान जखमीही झाले होते. या झटापटीत चीनचंही नुकसान झाल्याचं म्हटलं जातं, परंतु चीनने आकडे जारी केलेले नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या :
विस्तारवाद संपला, आता विकासवादाचा काळ, लेहमध्ये मोदींनी चीनला सुनावलं!
India China Face Off | भारत-चीन तणाव, पंतप्रधान नरेंद्र मोदी लेहमध्ये दाखल