एक्स्प्लोर

विस्तारवाद संपला, आता विकासवादाचा काळ, लेहमध्ये मोदींनी चीनला सुनावलं!

भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी पंतप्रधान लेह लडाखमध्ये दाखल झाले. लेहमधील निमू इथे मोदींनी भारतीय जवानांशी संवाद साधला. या संबोधनात मोदींनी एकीकडे भारतीय सैनिकांचं मनोधैर्य आणि उत्साह वाढवला, तर दुसरीकडे चीनलाही खडेबोल सुनावले.

लेह लडाख : भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी पंतप्रधान लेह लडाखमध्ये दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लेह दौऱ्यात निमूमध्ये भारतीय जवानांना संबोधित केलं. या संबोधनात मोदींनी एकीकडे भारतीय सैनिकांचं मनोधैर्य आणि उत्साह वाढवला, तर दुसरीकडे चीनलाही खडेबोल सुनावले. "भारतीय जवानांनी जगाला आपल्या शौर्याचा नमुना दाखवून दिला आहे," असं मोदी म्हणाले. तर लडाखमध्ये चीनच्या कुरापतींवर निशाणा साधताना मोदी म्हणाले की, "विस्तारवादाचा काळ मागे सरला आहे, आता विकासवादाचा काळ आहे."

चीनवर मोदींचा निशाणा चीनवर निशाणा साधताना मोदी म्हणाले की, "विस्तारवादाचा काळ संपला असून आता विकासवादाचा काळ आहे. वेगाने बदलत्या काळात विकासवादच गरजेचा आहे. मागील शतकात विस्तारवादानेच मनुष्यजातीचा विनाश केला. एखादा जर विस्तारवादाच्या हट्टाने पेटला तर हा विश्वाच्या शांततेसाठी धोका आहे. इतिहास साक्षीदार आहे की, अशी ताकद कायमच मिटून जाते."

चीन कायमच लडाख, अरुणाचल प्रदेशातील काही परिसरावर आपला दावा सांगत असतो. इतकंच नाही तर रशिया आणि भूतानच्या काही क्षेत्रावरही चीनने आपला दावा सांगितला आहे.

दोन मातांचा विचार करुन निर्णय घेतो : मोदी "जेव्हा मी देशाच्या सुरक्षेसंबंधी निर्णयांबाबत विचार करतो तेव्हा सर्वात आधी दोन माता माझ्या नजरेसमोर असतात. एक माता म्हणजे आपली भारत माता आणि दुसरी म्हणजे वीरमाता ज्यांनी सैनिकांना जन्म दिला आहे," असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. तसंच जवानांना सुरक्षा उपकरणे आणि शस्त्र पुरवण्याबाबत हरतऱ्हेची मदत सरकार करत असल्याचं मोदी म्हणाले.

'भारतमातेच्या संरक्षणासाठी तुमचं समर्पण अतुलनीय' आपल्या संबोधनात पतंप्रधान मोदींनी जवानांचा उत्साह वाढवला. ते म्हणाले की, तुमचे हात डोंगरांसारखे मजबूत आहे. तुमची इच्छाशक्ती या पर्वत रांगांपेक्षा दृढ आहे. शत्रुंनी जवानांचा उत्साह आणि राग पाहिला आहे. देशाची सुरक्षा तुमच्या हातात आहे, तुमच्या मजबूत इराद्यांमध्ये आहे तर केवळ मलाच नाही तर संपूर्ण देशाला अतुट विश्वास आहे आणि देश निश्चिंत आहे. तुमचं मनोधैर्य, शौर्य आणि भारतमातेच्या संरक्षणासाठी समर्पण अतुलनीय आहे. ज्या कठीण परिस्थितीमध्ये, ज्या उंचीवर तुम्ही भारतमातेची ढाल बनून तिचं रक्षण करत आहात, सेवा करत आहात, त्याची तुलना जगात कुठेही होऊ शकत नाही."

पंतप्रधान मोदींचा अचानक लेह दौरा भारत आणि चीन सीमेवर तणाव सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं सरप्राईज दिलं. सूर्योदय होण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अचानक लेहमध्ये पोहोचले. भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी पंतप्रधान लेह लडाखमध्ये दाखल झाले. विशेष म्हणजे मोदींच्या या दौऱ्याची अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. मोदींचा हा दौरा चीनला एकप्रकारे संदेशही आहे की, "देश आपल्या सैन्याच्या पाठिशी ठामपणे उभा आहे." पंतप्रधान मोदींसोबत चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत आणि लष्करप्रमुख एम एम नरवणे हे देखील उपस्थित आहेत.

पंतप्रधान सकाळी लेहमध्ये पोहोचले आणि जवानांची भेट घेतली. महत्त्वाचं म्हणजे याआधी फक्त चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांचाच लेह दौरा पूर्वनियोजित होता. मे महिन्यापासून सीमेवर चीनसोबत तणाव सुरु असून परिस्थिती गंभीर आहे. त्यातच पंतप्रधान मोदीही त्यांच्यासोबत लेहमध्ये पोहोचल्याने सगळ्यांचा आश्चर्याचा धक्का बसला.

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

- देशाची सुरक्षा तुमच्या हातात आहे, तुमच्या मजबूत इराद्यांमध्ये आहे तर केवळ मलाच नाही तर संपूर्ण देशाला अतुट विश्वास आहे आणि देश निश्चिंत आहे.

- तुम्ही तैनात असलेल्या उंच ठिकाणाापेक्षा तुमचं शौर्य उंच आहे. तुमचा निश्चय गलवान खोऱ्यापेक्षाही बळकट आहे

- तुमचे हात तुमच्या आजूबाजूला असलेल्या डोंगरांसारखे बळकट आणि मजबूत आहेत. तुमची इच्छाशक्ती या पर्वत रांगांपेक्षा दृढ आहे.

- तुमचं मनोधैर्य, शौर्य आणि भारतमातेच्या संरक्षणासाठी समर्पण अतुलनीय आहे. ज्या कठीण परिस्थितीमध्ये, ज्या उंचीवर तुम्ही भारतमातेची ढाल बनून तिचं रक्षण करत आहात, सेवा करत आहात, त्याची तुलना जगात कुठेही होऊ शकत नाही.

- 14 कोरच्या शौर्याच्या किस्से जगजाहीर आहेत. जगाने साहस पाहिलं आहे. तुमच्या शौर्याची गाथा घराघरात सांगितली जाते. भारताच्या शत्रुंनी तुमच्यातली आग पाहिलीय.

- आज प्रत्येक भारतीय तुमच्यासमोर म्हणजेच देशाच्या वीर सैनिकांसमोर नतमस्तक होत आहे. आज प्रत्येक भारतीय छाती तुमच्या शौर्य आणि पराक्रमाने फुलून आली आहे.

- मी गलवान खोऱ्यात शहीद जवानांना पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पण करतो.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget