DRDO चे अँटी कोविड औषध 2DG संरक्षणमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लॉन्च
DRDO ने हैदराबादच्या डॉक्टर रेड्डीजच्या लॅबमध्ये 10 हजार डोस तयार केले गेले आहेत. डॉक्टर रेड्डीज लॅब जून महिन्यापासून दर आठवड्याला एक लाख डोसची निर्मिती करण्यास सुरवात करणार आहे.
नवी दिल्ली : कोरोना विरुद्ध सुरु असलेल्या लढाईत आणखी एक औषध आजपासून वापरात येणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या उपस्थितीत आज डीआरडीओचं अँटी कोविड ड्रग 2-डीओक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी) लॉन्च करण्यात आलं. डीसीजीआयने अलीकडेच डीआरडीओच्या अँटी-कोविड औषध 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी) च्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली होती. डीआरडीओने डॉ. रेड्डीजच्या प्रयोगशाळांच्या सहकार्याने हे औषध तयार केले आहे.
DRDO ने हैदराबादच्या डॉक्टर रेड्डीजच्या लॅबमध्ये 10 हजार डोस तयार केले गेले आहेत. डॉक्टर रेड्डीज लॅब जून महिन्यापासून दर आठवड्याला एक लाख डोसची निर्मिती करण्यास सुरवात करणार आहे. पाण्यात विरघळली जाणारी ही औषधे लवकरच इतर रुग्णालयातही उपलब्ध होऊ शकतात.
Delhi: Defence Minister Rajnath Singh and Union Health Minister Dr Harsh Vardhan release first batch of Anti-COVID drug 2DG developed by DRDO pic.twitter.com/gUu6IuYlrT
— ANI (@ANI) May 17, 2021
औषध पावडर स्वरुपात मिळणार
DRDO ने विकसित केलेले हे औषध गोळी, सिरप किंवा इंजेक्शन नाही तर पावडर स्वरुपात पाकिटामध्ये मिळते, जे पाण्यात विरघळवून पिता येते. हे विषाणू, संक्रमित पेशींमध्ये जमा होऊन व्हायरल संश्लेषण आणि उर्जा उत्पादन थांबवून विषाणू वाढीस प्रतिबंधित करते. विषाणूंनी संक्रमित पेशींमध्ये त्याचे निवडक संग्रह हे औषध उत्कृष्ट बनवते. जेव्हा देशभरात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असते आणि रुग्णांना ऑक्सिजनची गरज असते अशा वेळी हे औषध खूप प्रभावी सिद्ध होऊ शकते. असा दावा केला जात आहे. या औषधांमुळे रुग्णांना बराच काळ रुग्णालयात राहण्याची गरज भासणार नाही.
ऑक्सिजनची कमी गरज
क्लिनिकल ट्रायलमधील परिणामांनुसार, या औषधाचे सेवन केल्यानंतर कोरोनाबाधित रुग्ण कमी वेळेत रिकव्हर होतात. तसेच रुग्णांना ऑक्सिजनची गरजही कमी लागत आहे. इतर उपचार पद्धतीच्या तुलनेने 2DG च्या वापराने रुग्ण कमी वेळेत कोरोनावर मात करत आहेत, म्हणजे कोरोनोबाधित रुग्ण कमी वेळेत बरे होत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या