एक्स्प्लोर

DRDO's Anti-Covid Drug : DRDO ने विकसित केलेल्या अँटी-कोविड औषधाला आपत्कालीन वापरास मंजुरी

डीआरडीओच्या वैज्ञनिकांनी एप्रिल 2020 मध्ये या औषधावर काम सुरु केलं होतं. यावेळी कोरोनावर हे औषध अत्यंत प्रभावशाली असल्याचं वैज्ञानिकांच्या लक्षात आलं. या आधारे DCGI ने मे 2020 मध्ये या औषधाच्या फेज 2 ट्रायलला मंजुरी दिला होती.

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा उद्रेक सुरु असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ड्रग्स कंन्ट्रोल जनरल ऑफ इंडियाने कोरोनाच्या उपचारासाठी आणखी एका औषधाच्या वापराला आपत्कालीन मंजुरी दिला आहे. डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लियर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेस (INMAS) आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्यूरल अॅंड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB) यांनी एकत्र येत या औषधांची निर्मिती केली आहे. या औषधाला सध्या 2-deoxy-D-glucose (2-DG) असं नाव देण्यात आलं आहे. या औषधाच्या उत्पादनाची जबाबदारी हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबरोटरिजवर देण्यात आली आहे. 

सध्या कोरोनाबाधित रुग्णांची ऑक्सिजन लेवल झपाट्याने कमी होणे ही मोठी समस्या आहे. यामुळे रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. यासाठी  2-DG हे औषध फायदेशीर ठरणार आहे. कारण  क्लिनिकल ट्रायलमधील परिणामांनुसार, कोरोनाबाधित  रुग्ण कमी वेळेत रिकव्हर होतात. तसेच रुग्णांना रुग्णांलयात ऑक्सिजनचा वापरही कमी करावा लागत आहे. इतर उपचार पद्धतीच्या तुलनेने 2-DG च्या वापराने रुग्ण कमी वेळेत कोरोनावर मात करत आहेत, म्हणजे कोरोनोबाधित रुग्ण कमी वेळेत बरे होत आहेत. 

झायडस कॅडिलाच्या कोरोनावरील औषधाला DGCI कडून आपत्कालीन वापरास परवानगी

यशस्वी निकालांच्या आधारे डीसीजीआयने नोव्हेंबर 2020 मध्ये तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांना परवानगी दिली. डिसेंबर 2020 ते मार्च 2021 दरम्यान दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू मधील 27 कोविड रुग्णालयात 220 रुग्णांवर III ऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी घेण्यात आली. तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीचा सविस्तर डेटा डीसीजीआयकडे सादर करण्यात आला. 2-डीजी आर्ममध्ये, रुग्णांचे प्रमाण जास्त प्रमाणात लक्षणानुसार सुधारले गेले आणि एसओसीच्या तुलनेत तिसऱ्या दिवसापर्यंत पूरक ऑक्सिजनवरील अवलंबित्व (42% च्या तुलनेत 31%) कमी झाले जे ऑक्सिजन थेरपी / अवलंबित्व यापासून लवकर सुटका दर्शवते

Covid-19 Cases in India: देशात कोरोनाचा कहर, 24 तासात 4 हजारांपेक्षा जास्त मृत्यू, चार लाखांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

औषध पावडर स्वरुपात मिळणार

DRDO ने विकसित केलेले हे औषध गोळी, सिरप किंवा इंजेक्शन नाही तर पावडर स्वरुपात पाकिटामध्ये  मिळते, जे पाण्यात विरघळवून पिता येते. हे विषाणू, संक्रमित पेशींमध्ये जमा होऊन व्हायरल संश्लेषण आणि उर्जा उत्पादन थांबवून विषाणू वाढीस प्रतिबंधित करते. विषाणूंनी संक्रमित पेशींमध्ये त्याचे निवडक संग्रह हे औषध उत्कृष्ट बनवते. जेव्हा देशभरात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असते आणि रुग्णांना ऑक्सिजनची गरज असते अशा वेळी हे औषध खूप प्रभावी सिद्ध होऊ शकते. असा दावा केला जात आहे. या औषधांमुळे रुग्णांना बराच काळ रुग्णालयात राहण्याची गरज भासणार नाही.

महाराष्ट्र कोरोनाविरोधातील लढाई चांगली लढतोय, पंतप्रधानांकडून कौतुक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accuse CCTV : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा वांद्रे स्टेशन येथिल फोटो समोरSaif Ali Khan Attacked Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणी आणखी एकजण ताब्यात, पोलिसांकडून तपासाला वेगABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 17 January 2025Walmik Karad Property : वाल्मिक कराडची करोडोंची प्रॉपर्टी; दोन पत्नींच्या नावे किती फ्लॅट्स? पाहा A TO Z सगळी माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
Embed widget