एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

चेन्नईला मिचॉन्ग चक्रीवादळाचा तडाखा; इंडिगोकडून रांची-चेन्नई फ्लाईट रद्द, झारखंडहून सुटणाऱ्या ट्रेनही रद्द

Cyclone Michaung: मिचॉन्ग चक्रीवादळचा फटका विमान वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीला बसला आहे.

Cyclone Michaung Updates : 'मिचॉन्ग' चक्रीवादळामुळे (Michaung Cyclone) सोमवारी चेन्नई (Chennai) आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस (Rain Updates) पडत आहे. मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे चेन्नई विमानतळावरील (Chennai Airport) सर्व ऑपरेशन्स 5 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत रद्द करण्यात आले आहेत. चक्रीवादळामुळे हवाई सेवांव्यतिरिक्त, रेल्वे सेवा (Railway Services) रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही ट्रेन पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. 'मिचॉन्ग' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे रविवारी रात्री उशिरापासून चेन्नई आणि आसपासच्या चेंगलपेट, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे.

मिचॉन्ग चक्रीवादळाच्या आगमनानं चेन्नई विमानतळाच्या धावपट्टीवर पाणी साचलं आहे. यामुळे सोमवारी फ्लाईट क्रमांक 6E6113 आणि 209 चेन्नई-रांची-चेन्नई फ्लाइट रद्द करण्यात आलेली. दरम्यान, ही फ्लाईट संध्याकाळी 6.25 वाजता चेन्नईहून रांची येथे पोहोचते आणि रांचीहून चेन्नईला संध्याकाळी 6:55 वाजता पुन्हा रवाना होते. इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, प्रवाशांना मोबाईल मेसेजद्वारे फ्लाईट रद्द झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच, मिचॉन्ग चक्रीवादळामुळे रेल्वेनं अनेक गाड्या रद्दही केल्या आहेत. सर एम विश्वेश्वरय्या, बंगळुरू-हटिया एक्स्प्रेस (12836) 5 डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे.

मिचॉन्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेगाड्याही रद्द 

सर एम विश्वेश्वरय्या, बंगळुरू-हटिया वीकली एक्सप्रेस (18638) 5 डिसेंबरसाठी रद्द करण्यात आली आहे. हातिया-एर्नाकुलम धरती आबा एक्स्प्रेस (22837) सोमवारी रद्द करण्यात आली आहे. एर्नाकुलम-हटिया धरती आबा एक्सप्रेस ट्रेन (22838) 6 डिसेंबर रोजी रद्द राहील, कोईम्बतूर-बरौनी साप्ताहिक एक्सप्रेस विशेष ट्रेन (03358) 6 डिसेंबर रोजी रद्द राहील. धनबाद-अल्लापुझा एक्स्प्रेस (13351) सोमवारी रद्द करण्यात आली आहे. अल्लापुझा-धनबाद एक्स्प्रेस (13352) 6 आणि 7 डिसेंबरसाठी रद्द करण्यात आली आहे.

7 डिसेंबरपर्यंत मुसळधार पाऊस 

हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 आणि 7 डिसेंबर रोजी राज्यातील जवळपास सर्वच भागांत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. 8 डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहील. त्यामुळे किमान तापमानातही वाढ दिसून येईल, तर ढगांमुळे कमाल तापमानात घट होऊ शकते. 9 डिसेंबरपासून आकाश निरभ्र असेल. त्यानंतर किमान तापमानात घट अपेक्षित आहे. सोमवारी मिचॉन्ग चक्रीवादळामुळे झारखंडच्या दक्षिण आणि मध्य जिल्ह्यांतील अनेक भागांत ढगाळ वातावरण होतं. राजधानीतही दिवसभर ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे कमाल तापमानात घट झाली आहे. राजधानीच्या अनेक भागांत तुरळक पाऊस झाल्याचंही पाहायला मिळालं.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Cyclone Michaung : आज आंध्र प्रदेशात धडकणार मिचॉन्ग, चक्रीवादळानं दक्षिण भारताला झोडपलं; चेन्नईत पाच जणांचा मृत्यू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Karad : अजित पवारांची यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतींना आदरांजलीABP Majha Headlines :  9 AM : 25 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSharad Pawar Pritisangam : प्रितीसंगम येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना शरद पवारांकडून अभिवादनTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 25 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Embed widget