CoWin App : कोविन अॅपचा जगभर डंका वाजणार; 12 देशांनी केली तंत्रज्ञान हस्तांतरणाची मागणी
CoWin : कोरोना लसीकरणामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कोविन अॅपच्या तंत्रज्ञानाची माहिती जगातल्या 12 देशांनी मागितली असल्याची माहिती आहे.
नवी दिल्ली : जगातलं सर्वात मोठं लसीकरण भारतात होत असून आतापर्यंत जवळपास 1.13 कोटी नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. या ऐतिहासिक कामगिरीत कोविन अॅपने महत्वाची भूमिका बजावली आहे. आता याच कोविन अॅपचा डंका जगभरात वाजणार आहे. कोविन अॅपच्या तंत्रज्ञानाची माहिती जगभरातल्या 12 देशांनी घ्यायला सुरुवात केली आहे. येत्या काळात या देशांकडून कोविन अॅपच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण केलं जाण्याची शक्यता आहे.
कोविन अॅपच्या तंत्रज्ञानासंबंधी 12 देशांनी भारताशी चर्चा सुरु केली असून ही चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. या 12 देशांमध्ये अर्जेंटिना, बोलिव्हिया, ब्राझील, कोलंबिया, इक्वेडोर, गियाना, पराग्वे, पेरू, सूरीनाम, उरुग्वे आणि व्हेनेझुएला या देशांचा समावेश आहे.
एकाच दिवसात 2.5 कोटी लसीकरणाचे रजिस्ट्रेशन
कोरोना लसीकरणामध्ये कोविन अॅपची उपयुक्तता समोर आली असून या अॅपच्या माध्यमातून एकाच दिवसात 2.5 कोटी डोसचे रजिस्ट्रेशन करण्यात आलं होतं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसादिवशी हे 2.5 कोटी डोसचे रजिस्ट्रेशन करण्यात आलं असून त्या दिवशी प्रति सेंकदाला 800 डोस देण्यात आले होते.
या 12 देशांशी सुरु असलेल्या चर्चेवर परराष्ट्र मंत्रालय बारीक नजर ठेऊन असल्याचं नॅशनल हेल्थ ऑथोरिटीचे सीईओ डॉ. आर. एस. शर्मा यांनी सांगितलं. या देशांनी भारतासोबतच्या करारावर हस्ताक्षर केले असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Mumbai vaccination : लसीकरणाचा विक्रम, मुंबई ठरला देशातील 1 कोटी लसीकरणाचा टप्पा पार करणारा पहिला जिल्हा
- Vaccination for Pregnant Women: आता गरोदर महिलाही लस घेऊ शकणार, NTAGI शिफारशीनंतर आरोग्य मंत्रालयाचा निर्णय
- Corona Vaccination : कोविन अॅपवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अनिवार्य नाही, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha