Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 10 डिसेंबर 2024 : 8 PM
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 10 डिसेंबर 2024 : 8 PM
मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचं ईव्हीएमविरोधात आंदोलन, ईव्हीएमच्या प्रतिकृतीचं अरबी समुद्रात केलं विसर्जन, 'EVM हटवा, लोकशाही वाचवा' ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका.
परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या स्टोनचं नुकसान, घटनेनंतर आंबेडकरी अनुयायी आक्रमक, आंदोलकांनी नंदीग्राम एक्सप्रेस रोखली, माथेफिरुवर कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी.
पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार, तर शुक्रवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होईल, पाणीपुरवठा विभागाची माहिती.
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूंजमधील टायटन शोरूममध्ये मोठी चोरी, चोरट्यांनी २० लाखांचं ब्रँडेड घड्याळ केलं लंपास, चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद.
जालन्यात पत्नीचे लाडकी बहिण योजनेचे साडेसात हजार रुपये चुकून पतीच्या खात्यात आले होते, विलास भुतेकर यांनी हे पैसे शासनाला परत केले.
पुण्याच्या देहुरोड परिसरातील गांधीनगरमध्ये बेकायदेशीर बांगलादेशींचं वास्तव्य, गोपनीय माहितीच्या आधारे दहशतवाद विरोधी पथकाची चौघांवर कारवाई.
जळगाव शहरातील MIDC परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या कारने अचानक पेट घेतला, शॉर्टसर्किटमुळे कारने पेट घेतला असावा असा अंदाज, आगीत संपूर्ण कार जळून खाक.