Sputnik Light COVID Vaccine: भारतात स्पुटनिक लाइट सिंगल-डोस लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी
Sputnik Light COVID Vaccine: भारताचे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यासदंर्भात माहिती दिलीय.
Sputnik Light COVID Vaccine: ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं भारतात स्पुटनिक लाइट सिंगल-डोस लसीला आपत्कालीन वापराची परवानगी दिलीय. भारताचे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी यासदंर्भात माहिती दिलीय. स्पुटनिक ही देशातील 9 वी कोरोना लस आहे. स्पुटनिक लाईट सिंगल डोसमुळं कोरोना महामारीविरुद्ध लढा आणखी मजबूज होईल, असंही त्यांनी म्हटलंय.
मनसुख मांडविया शुक्रवारी म्हणाले होते की, देशात 15 ते 18 वर्षे वयोगटातील 65 टक्के लोकांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली आहे. यंग इंडियाचा ऐतिहासिक प्रवास सुरुच आहे. देशात अवघ्या एका महिन्यात 15 ते 18 वर्षे वयोगटातील 65 टक्के मुलांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम नवीन विक्रम निर्माण करत आहे, असं ट्वीट मनसुख मांडविया यांनी केलंय.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 34.90 लाख पात्र किशोरांना दुसरा डोस देण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, गेल्या 24 तासांत लसीचे 55 लाखाहून अधिक डोस देण्यात आले असून, देशात आतापर्यंत 168.47 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी 16 जानेवारी रोजी देशव्यापी लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती, ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले होते. आघाडीच्या जवानांचे लसीकरण गेल्या वर्षी २ फेब्रुवारीपासून सुरू झाले. नंतरच्या टप्प्यात वेगवेगळ्या वयोगटांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली.
हे देखील वाचा-
- Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यासह देशातील कोरोनाची आकडेवारी
- MBBS in Hindi : भोपाळमध्ये लवकरच हिंदीमध्ये MBBS; महाराष्ट्रात मराठी भाषेत कधी?
- कोरोनाकाळात रुग्णांकडून घेतलेले जास्तीचे पैसे परत न करणाऱ्या रुग्णालयांची नोंदणी रद्द करणार, जिल्हा शल्यचिकित्सकांचा इशारा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha