एक्स्प्लोर

कोवॅक्सिन WHO च्या मान्यताप्राप्त यादीत अद्याप नाही, मंजुरी मिळेपर्यंत लसधारकांची आंतरराष्ट्रीय प्रवासात अडचण

देशाबाहेर जायचं तर पासपोर्ट- व्हिसा आवश्यक असतो. पण कोरोनामुळे जीवनशैलीत जे अनेक बदल आणले त्यात आता याही गोष्टीचा समावेश झालाय.

 नवी दिल्ली : जगात अनेक देशांमध्ये आता लॉकडाऊन हळूहळू  उठवला जातोय. पण आंतरराष्ट्रीय प्रवाशांना परवानगी देताना WHO  मान्यताप्राप्त लस हा महत्वाचा घटक बनलाय. त्याचमुळे भारतात कोवॅक्सिन ही भारत बायोटेकची लस घेतलेल्यांना मात्र पुढच्या काही दिवसांसाठी तरी अडचण जाणवणार आहे.  

देशाबाहेर प्रवास करु इच्छिणारे भारतीय को-वॅक्सिन पेक्षा कोविशील्ड लसीच्या शोधात आहेत. कुठलीही लस घ्या, परिणामकारता सारखीच असं देशाचं आरोग्यमंत्रालय सांगत असतानाही असं का होतंय तर याचं कारण को-वॅक्सिन जागतिक आरोग्य संघटनेनं मान्य केलेल्या लसींच्या यादीत अजून समाविष्ट नाही.त्याचमुळे अनेक देश केवळ कोविशील्ड लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश देतायत. कोरोना काळात आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवी नियमावली बनतेय, आणि त्यात मान्यताप्राप्त लस घेतलेल्यांनाच प्रवेश असा नियम अनेक देशांनी लागू केलाय, काही त्या तयारीत आहेत.

 एरवी देशाबाहेर जायचं तर पासपोर्ट- व्हिसा आवश्यक असतो. पण कोरोनामुळे जीवनशैलीत जे अनेक बदल आणले त्यात आता याही गोष्टीचा समावेश झालाय. कारण तुम्ही कुठली लस घेतलीय यावरच तुम्हाला त्या देशात प्रवेश मिळणार की नाही हे ठरतं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत सीरमची कोविशील्ड, मॉडेर्ना, फायझर, जॉन्सन अँड जॉन्सन, सायनोफार्मसारख्या लसींचा समावेश आहे. पण कोवॅक्सिन मात्र यादीत नाहीय.

  कुठल्या लसीला देशात परवानगी द्यायची हा संपूर्णपणे त्या देशाचा अधिकार आहे. को-वॅक्सिन हैदराबादच्या भारत बायोटेक आणि आयसीएमआरनं संयुक्तपणे विकसित केली आहे. भारतात या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी औषध महानियंत्रकानी जानेवारीतच परवानगी दिली. जागतिक आरोग्य संघटनेकडे कोवॅक्सिनच्या मान्यतेचा अर्ज अजून प्रलंबित आहे. मे-जूनमध्येच याबाबतची एक प्राथमिक बैठक पार पडेल. त्यानंतर या लसीबाबतची सगळी कागदपत्रं, पुरावे सादर होऊन जागतिक आरोग्य संघटना त्याबाबतचा निर्णय घेईल.

 आंतरराष्ट्रीय प्रवासात मान्यताप्राप्त लसींबाबत जे नियम होतायत, त्याचा सर्वाधिक परिणाम परदेशी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर होतोय..ऑगस्टच्या दरम्यान या विद्यार्थ्याचं नवं शैक्षणिक वर्ष सुरु होतं. त्यामुळे आत्तापासूनच त्यांना प्रवासाची तयारी करणं आवश्यक आहे. पण भारतात कोवीशिल्ड ऐवजी को-वॅक्सिन लस घेतलेल्यांना डब्लुएचओची परवानगी मिळेपर्यंत प्रवासात अडचणी येऊ शकतात.

 अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवासाबाबत लसीकरण आवश्यक केलं आहे. एकतर  त्यांच्या देशानं स्वत: विकसित केलेल्या लसी किंवा जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत असलेल्या लसीच ग्राह्य धरल्या जातायत. कोवॅक्सिन ही लस भारतानं अनेक देशांमध्ये निर्यातही केलीय. पण आत्तापर्यंत केवळ 10 पेक्षा कमी देशांनीच प्रवासाच्या परवानगीसाठी ही लस ग्राह्य धरलीय. ज्यात नेपाळ, मॉरिशस, फिलीपीन्स, इराण, मेक्सिको, गयाना, पॅराग्वे, झिम्बाब्वे फिलीपीन्स या देशांचा तूर्तास समावेश आहे. त्यामुळे आता इतर देशांमध्ये स्वतंत्रपणे निर्णय होतायत का आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत को-वॅक्सिन कधी येते हे पाहावं लागेल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani Violance : मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमाबंदीचे आदेश!
मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमाबंदीचे आदेश!
Multibagger Stock: 54 रुपयांचा स्टॉक पोहोचला 1300 रुपयांवर, ब्रोकरेज हाऊसनं आता कोणता अंदाज वर्तवला? 
54 रुपयांच्या स्टॉकनं दिला गुंतवणूकदारांना 12 पट परतावा, ब्रोकरेज हाऊसनं दिला लाखमोलाचा सल्ला
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
India Vs Australia : राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ramdas Athawale : आरोपीवर कठोर कारवाई व्हावी - रामदास आठवलेParbhani Protest : परभणीत आंदोलन पेटलं, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्जParbhani Protest : परभणी जिल्हा बंदला हिंसक वळण; आंदोलकांनी पेटवले पाईपRahul Patil on Parbhani Protest :  परभणीतील आंदोलनाला हिंसक वळण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani Violance : मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमाबंदीचे आदेश!
मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमाबंदीचे आदेश!
Multibagger Stock: 54 रुपयांचा स्टॉक पोहोचला 1300 रुपयांवर, ब्रोकरेज हाऊसनं आता कोणता अंदाज वर्तवला? 
54 रुपयांच्या स्टॉकनं दिला गुंतवणूकदारांना 12 पट परतावा, ब्रोकरेज हाऊसनं दिला लाखमोलाचा सल्ला
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
India Vs Australia : राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
निष्काळजीपणाची हद्द! अहवाल येण्यापूर्वीच 8.5 हजार रुग्णांच्या पोटात बनावट गोळ्या, औषध यंत्रणाच उठली जीवावर?
निष्काळजीपणाची हद्द! अहवाल येण्यापूर्वीच 8.5 हजार रुग्णांच्या पोटात बनावट गोळ्या, औषध यंत्रणाच उठली जीवावर?
Parbhani Band : 'परभणी बंद'ला हिंसक वळण; संतप्त जमावाकडून पीव्हीसी पाईपांची जाळपोळ, प्रशासनाचे शांततेचे आवाहन
'परभणी बंद'ला हिंसक वळण; संतप्त जमावाकडून पीव्हीसी पाईपांची जाळपोळ, प्रशासनाचे शांततेचे आवाहन
24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..'  परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..
24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..' परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..
परभणीत आंदोलन पेटलं, हिंसक वळण; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, प्रकाश आंबेडकरांचा इशारा
परभणीत आंदोलन पेटलं, हिंसक वळण; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, प्रकाश आंबेडकरांचा इशारा
Embed widget