(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | दिलासादायक! केरळमध्ये 93 आणि 88 वर्षीय जोडप्याचा कोरानाशी यशस्वी लढा
केरळमध्ये एका वयोवृद्ध दाम्पत्याने कोरोनावर मात केली आहे. त्यांच्या कोरोना तपासणीचा अहवाल नेगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
कोट्टायम (केरळ) : केरळमधील कोट्टायम जिल्ह्यामध्ये कोरोना व्हायरचा संसर्ग झालेल्यांपैकी सर्वात जास्त वय असलेले पती-पत्नी कोरोनावर मात करण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांचा कोरोना तपासणीचा अहवाल नेगेटिव्ह आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. वैद्यकिय विश्वात याला एक चमत्कार मानलं जात आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, थॉमस अब्राहम (93) आणि त्यांची पत्नी मरियम्मा (88) कोट्टायमा येथील सरकारी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये मार्चपासून कोरोनाशी लढा देत होते. यामध्ये त्यांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली असून या लढाईत विजय मिळवला आहे.
पाहा व्हिडीओ : पाच एप्रिलच्या दिवशी 22 मार्चची पुनरावृत्ती होणार नाही ना? | विशेष रिपोर्ट
केरळमधील एका प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले की, 'कोरोनाच्या विळख्यात अडकलेलं वयोवृद्ध दाम्पत्य आता पूर्णपणे ठिक झालं असून कोरोनाच्या तपासणी अहवालात ते कोरोनामुक्त झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यानंतर त्यांना घरी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.' हे वयोवृद्ध दाम्पत्य केरळमधील पथनामथिट्टा जिल्ह्यातील रन्नी गावातील रहिवाशी थॉमस अब्राहम (93) आणि पत्नी मरियम्मा (88) यांचा मुलगा, सून आणि नातू मागील महिन्यात इटलीहून परतले होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. या तिघांच्या संपर्कात आल्यामुळे या वयोवृद्ध दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली होती.
दरम्यान, भारतात सर्वात पहिला कोरोना बाधित केरळमध्ये आढळून आला होता. सध्या केरळमध्ये 295 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 24 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे केरळमध्ये दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. देशभरातील आकड्यांबाबत बोलायचे झाले तर आतापर्यंत 3108 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 62 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 221 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
संबंधित बातम्या :
#Aarogyasetu | सरकारकडून 'आरोग्य सेतु' अॅप लॉन्च, कोरोनापासून दूर राहण्यास मदत करणारं अॅप
Coronavirus | कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी वर्ल्ड बँकेची भारताला 7500 कोटींची मदत